मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी वेबिनारच्या माध्यमातून समाजातल्या अनेक मान्यवरांशी संवाद साधला. त्यांच्या करोनासंदर्भातल्या प्रश्नांना उत्तरं दिली. लोकसत्ता विश्लेषण या कार्यक्रमात प्रवीण परदेशी आले होते. करोनामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदी-संचारबंदीच्या काळात हा संवाद वेबिनारच्या माध्यमातून, ‘झूम अ‍ॅप’च्या सहाय्याने साधण्यात आला. करोनापासून मुंबईकर किती सुरक्षित? काय काय उपायोजना करण्यात आल्या? वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी हे करोनाच्या लढाईत योद्धे म्हणून कसं काम करत आहेत? या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली पाहुयात हा संपूर्ण कार्यक्रम या व्हिडीओच्या माध्यमातून-