मुंबई : मुंबई दौऱ्यादरम्यान राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना शिवडी येथील महानगरदंडाधिकाऱ्यांनी बुधवारी समन्स बजावत २ मार्चला हजर राहण्याचे आदेश दिले. ममता यांनी मुंबईतील कार्यक्रमादरम्यान त्यांची अधिकृत कर्तव्ये पार पाडलेली नाहीत. त्यामुळे त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असल्या तरी त्यांच्यावर कारवाईसाठी मंजुरीची आवश्यकता नाही किंवा कारवाई करण्यासाठी कोणताही अडथळा नसल्याचेही महानगरदंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी उपरोक्त आदेश देताना स्पष्ट केले. राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी ममता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कफ परेड पोलिसांना देण्याची मागणी भाजपचे मुंबई विभागाचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Feb 2022 रोजी प्रकाशित
ममतांना २ मार्चला हजर राहण्याचे आदेश
ममता यांनी मुंबईतील कार्यक्रमादरम्यान त्यांची अधिकृत कर्तव्ये पार पाडलेली नाहीत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 03-02-2022 at 00:14 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West bengal chief minister mamata banerjee has been accused of insulting the national anthem wednesday summons akp