मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी १४ एप्रिल रोजी पश्चिम आणि मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार होता. मात्र त्यामुळे प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने बोरिवली – गोरेगाव दरम्यानचा ब्लॉक रद्द केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त अनेक अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी जात असतात. मात्र पश्चिम रेल्वेने १४ मे रोजी बोरिवली – गोरेगावदरम्यान विविध कामांसाठी मेगाब्लॉक घेतल्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे प्रवासी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच हा ब्लॉक रद्द करण्याची मागणी प्रवासी संघटनांबरोबरच लोकप्रतिनिधी, सामाजिक नेत्यांकडून करण्यात आली होती. ही बाब लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाने रविवारचा बोरिवली-गोरेगावदरम्यानचा ब्लॉक रद्द केला.

हेही वाचा…खासगी भूखंडावरील वृक्ष छाटणीसाठी सोसायट्यांना नोटीस, प्रति झाड ८०० रुपये ते चार हजार रुपये शुल्क

दरम्यान, मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक रविवारी घेण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी सांगितले. त्यामुळे मध्य रेल्वेवरून प्रवास करताना प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.