पश्चिम रेल्वे मार्गावर आज सकाळीच तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. बोरीवली-कांदिवली दरम्यान विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती.
आज सकाळी पावणे सातच्या सुमारास बोरीवली-कांदिवली दरम्यान विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने जलद आणि धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर काही वेळातच हा बिघाड दुरुस्त करण्यात  आला. मात्र, हा बिघाड दुरुस्त झाला असला तरी चर्चगेटकडे येणा-या वाहतूकीवर याचा परिणाम झाला आहे. चर्चगेटकडे येणा-या लोकल तब्बल अर्धा तास उशिराने धावत आहेत. रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी पाहावयास मिळत आहे. बोरिवली ते विरार व चर्चगेट ते कांदिवली वाहतूक सुरळीत चालू आहे. दरम्यान, पश्चिम द्रुतगती महामार्गावर जेव्हीएलआरजवळ ट्रक बंद पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. कांदिवलीहून विलेपार्लेच्या दिशेने जाणा-या वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. उशिराने धावणा-या रेल्वे आणि वाहतूक कोंडीमुळे सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार प्रवाशांचे हाल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Western railway running late by 15 minutes
First published on: 11-04-2016 at 08:54 IST