शोभा डेंच्या ‘त्या’ ट्विटला मुंबई पोलिसांचे चोख प्रत्युत्तर

पोलीस त्यांच्या प्रतिष्ठेसाठी ठामपणे उभे राहिले, याबद्दल त्यांना सलाम,

When Mumbai Police gave a ‘fit’ting reply to Shobhaa De’s punny tweet, Shobha De , BMC Election 2017, Mumbai police, controversy , Loksatta, body shame, cops, Loksatta news, Marathi, Marathi news
Shobhaa De punny tweet : शोभा डे यांनी मंगळवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचे छायाचित्र ट्विट केले होते. मात्र, या ट्विटमधील छायाचित्राबरोबरचा संदेश संबंधित कर्मचाऱ्यावर शारीरिक टिप्पणी करणारा होता.

शोभा डे यांनी पोलीस कर्मचाऱ्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला मुंबई पोलिसांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शोभा डे यांनी काल यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मुंबई पोलिसांची खिल्ली उडविणारे एक छायाचित्र ट्विट केले होते. या छायाचित्राबरोबरचा संदेश संबंधित कर्मचाऱ्यावर शारीरिक टिप्पणी करणारा होता. मात्र, शोभा डे यांच्या ट्विटनंतर मुंबई पोलिसांनी शोभा डे यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. आम्हालाही विनोद आवडतात. मात्र, याठिकाणी वापरण्यात आलेला संदर्भ पूर्णपणे चुकीचा आहे. छायाचित्रातील कर्मचाऱ्याने घातलेला गणवेश हा मुंबई पोलिसांचा नाही. आम्हाला तुमच्यासारख्या जबाबदार नागरिकाकडून अजून चांगल्या अपेक्षा आहेत, असा टोला या ट्विटमधून डे यांना लगावला आहे. त्यानंतर अनेक ट्विटरकरांनीही शोभा डे यांना प्रत्युत्तर दिल्याबद्दल मुंबई पोलिसांचे कौतूक करत त्यांना पाठिंबा दिला. मुंबई पोलीस त्यांच्या प्रतिष्ठेसाठी ठामपणे उभे राहिले, याबद्दल त्यांना सलाम, अशा प्रतिक्रियाही काही ट्विटरकरांनी व्यक्त केल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: When mumbai police gave a befitting reply to shobhaa de punny tweet