गेली १५ वर्षे सत्तेत असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही, मग आताच धांगडधिंगा कशाला, असा सवाल विरोधकांना करतानाच, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, तर कर्जमुक्ती व्हायलाच हवी, असे ठाकरे यांनी सरकारलाही बजावले आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी गेल्या तीन-चार दिवसांपासून विरोधकांनी विधिमंडळ परिसरात जोरदार घोषणाबाजी व आंदोलन केले आणि कामकाजही रोखले. या गोंधळावर ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले. विरोधकांनी विरोधकांप्रमाणे राहावे, असा सल्ला ठाकरे यांनी
दिला.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jul 2015 रोजी प्रकाशित
आताच धांगडधिंगा कशाला?-उद्धव
गेली १५ वर्षे सत्तेत असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही, मग आताच धांगडधिंगा कशाला, असा सवाल विरोधकांना करतानाच, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, तर कर्जमुक्ती व्हायलाच हवी

First published on: 17-07-2015 at 04:58 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: While farmers loan waiver was not in power for 15 years