मुंबई : राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागावर (एनसीबी) होणारे आरोप, या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होणारा पदाचा दुरुपयोग आदी

तक्रोरींबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्राद्वारे लक्ष वेधणार असल्याचे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते  व अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी सांगितले. समीर वानखेडे यांच्यावरील लाचखोरीच्या आरोपांची विशेष चौकशी पथकाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मलिक यांनी करतानाच एनसीबीवर गंभीर आरोप केले.

राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या कारभारावर गेले काही दिवस मलिक हे दररोज आरोप करीत आहेत. या संदर्भात मलिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन सारी माहिती दिली. एनसीबीच्या कारवायांबाबत मुख्यमंत्री लवकरच पंतप्रधानांचे लक्ष वेधणार आहेत, असे मलिक यांनी पत्रकारांना सांगितले. याशिवाय एनसीबीच्या कारभाराबाबत मलिक यांनी गंभीर स्वरूपाचे आरोपही के ले.

समीर वानखेडे यांच्यांकडून दोन खासगी व्यक्तींमार्फत मुंबईतील उद्योगपती, अभिनेते व इतरांचे फोन टॅप के ले जात असल्याचा आरोप केला.

वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडे माझ्या मुलीच्या दूरध्वनी संभाषणाची सविस्तर (सीडीआर) माहिती मागितली होती, परंतु एखाद्याच्या खाजगी जीवनाशी संबंधित  माहिती देऊ शकत नाही असे पोलिसांनी त्यांना  सांगितले.

चित्रपट क्षेत्राची बदनामी..मुंबईतील चित्रपट उद्योग हा हॉलीवूडनंतरचा जगातला एक मोठा उद्योग आहे. लाखो लोकांचा त्यावर रोजगार आहे. देशाच्या जीडीपीमध्ये तीन-चार टक्के वाटा आहे. जर या पद्धतीने या उद्योगाला बदनाम के ले तर त्याचा परिणाम काही अभिनेत्यांवरच होईल असे नव्हे तर लाखो लोकांचा रोजगार यावर आहे. ते लाखो लोक अडचणीत येतील, याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी चिंता व्यक्त के ल्याचे मलिक यांनी सांगितले.

मुंबईत चार तक्रारी

मुंबई: अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे व राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्यातील आरोप-प्रत्यारोपानंतर आता याप्रकरणी सहा तक्रारी मुंबई पोलिसांकडे आल्या आहेत. त्यातील चार तक्रारी वानखेडेंविरोधात असून, त्यात ‘एनसीबी’चे पंच प्रभाकर साईल यांच्या आरोपांचाही समावेश आहे.