मढ परिसरातील शिवाजी नगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने शनिवारी दुपारी साडीने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी महिलेची आई आणि पतीचा जबाब घेण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. कौटुंबिक वादातून या महिलेने आत्महत्या केली असावी असा संशय आहे. शिवाजी नगरमध्ये राहणाऱ्या उषा अशोक कुटे (३०) या महिलेने दुपारी १२.३० च्या सुमारास स्वत:ला खोलीत कोंडून घेतले. पंख्याला साडी बांधून तिने गळफास लावून घेतला आणि आत्महत्या केली. उषाने कौटुंबिक वादाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय आहे. उषाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी मालवणी पोलीस तपास करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman commits suicide
First published on: 14-12-2014 at 02:09 IST