उन्हाळ्यासोबत स्वाइन फ्लूची साथ आटोक्यात आली असतानाच कस्तुरबा रुग्णालयात सोमवारी रात्री एका २५ वर्षांच्या महिलेचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. मुंब्रा येथे राहणाऱ्या या महिलेला सुरुवातीला फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आठवडय़ाभरापूर्वी महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात तिला हलवण्यात आले. तिला न्युमोनिया झाला होता. कस्तुरबामध्ये दाखल केल्यावर स्वाइन फ्लू असल्याचेही समजले. या दोन्ही आजारांच्या गुंतागुंतीमुळे संबंधित महिलेची स्थिती खालावत गेली व सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. आतापर्यंत मुंबईत स्वाइन फ्लूचे ४५ मृत्यू नोंदले गेले असून त्यातील १५ मुंबईतील रहिवासी होते.
संग्रहित लेख, दिनांक 13th May 2015 रोजी प्रकाशित
स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू
उन्हाळ्यासोबत स्वाइन फ्लूची साथ आटोक्यात आली असतानाच कस्तुरबा रुग्णालयात सोमवारी रात्री एका २५ वर्षांच्या महिलेचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला.
First published on: 13-05-2015 at 12:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman dies of swine flu in mumbai