मुंबई : अश्लील छायाचित्रे समाजमाध्यमांवर पसरविण्याची धमकी देत एका २५ वर्षीय महिलेवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना मानखुर्दमध्ये घडली. चार दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेची पीडित महिलेने तक्रार केल्यानंतर ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल करत मंगळवारी दोन्ही आरोपींना अटक केली. अमजदअली मोहम्मदजमा खान (३०) आणि नूर मोहम्मद नजीर शेख (४२) अशी या आरोपींची नावे आहेत.