उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेलं वाहन सापडल्या प्रकरणाचा तपास करणारी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) सचिन वाझेंसोबत हॉटेलमध्ये प्रवेश करणाऱ्या महिलेचा शोध घेत होती. सचिन वाझे दक्षिण मुंबईमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये आले तेव्हा ही महिलादेखील त्यांच्या मागून प्रवेश करत असल्याचं दिसत होतं. सचिन वाझे १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. ही महिला नेमकी कोण आहे याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न एनआयएकडून सुरु होते. त्यानंतर आता एनआयएकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रामध्ये या महिलेचाबाबत खुलासा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसुख हिरेन यांची स्कॉर्पिओ बेपत्ता होण्याच्या एक दिवस आधी सचिन वाझे हॉटेलमध्ये वास्तव्यास आले होते. तपासादरम्यान सचिन वाझे यांनी बनावट आधार कार्ड वापरल्याचं समोर आलं आहे. याशिवाय हॉटेलमधील वास्तव्यादरम्यान एक अज्ञात महिला त्याच्यासोबत होती असंही एएनआयएच्या तपासात उघड झालं होतं.

सचिन वाझे क्राइम इंटेलिजन्स युनिटमध्ये असताना तपास करत असलेल्या एका दुसऱ्या प्रकरणात या महिलेची चौकशी केली जात होती. सचिव वाझे यांच्याकडे महिलेसंबंधी चौकशी केली, मात्र ते तपासात सहकार्य करत नसल्याचे त्यावेळी एनआयएने सांगितले होते.

…म्हणून सचिन वाझे पहाटे ४.३० वाजता पुन्हा साईटवर गेले होते; NIA च्या चार्जशीटमध्ये खुलासा

त्यानंतर एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात या महिलेबाबत खुलासा झाला आहे. फेब्रुवारीमध्ये दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सचिन वाझेसोबत दिसणारी महिला कथितरीत्या शरीरविक्रय करणारी होती. ती महिला २०११ पासून वाझेच्या संपर्कात होती असे एनआयएने म्हटले आहे. सेवेमध्ये पुन्हा रुजू झाल्यानंतर वाझे या महिलेला ऑगस्ट २०२० पासून दरमहा ५०,००० रुपये देत होता.

मीरा रोड येथे राहणारी ३६ वर्षीय महिला, तिच्या पतीपासून विभक्त होती आणि एस्कॉर्ट म्हणून काम करत होती. तिने एनआयएला सांगितले की ती २०११ मध्ये वाझेला भेटली आणि २०१३ पासून मध्ये वाझे तिच्याकडे येत असत. जबाबानुसार, त्यानंतर वाझे तिच्याशी सतत संपर्कात होता. सुरुवातीला, त्याने तिला एक व्यापारी असल्याचे सांगितले होते. पण नंतर आपण पोलीस अधिकारी असल्याची माहिती त्याने दिली.

या महिलेचे वाझेशी व्यावसायिक संबंध होते आणि दोघांनी २०१६ मध्ये महिलेच्या मुलाच्या नावाने दोन कंपन्या सुरू केल्या होत्या. इलेक्ट्रिक दुचाकी भाड्याने देण्याची कंपनी सुरु करण्याचा करण्याचा वाझेचा विचार होता. वाझे चांगली कमाई करत नव्हता, त्यावेळी या महिलेने त्याला शरीरविक्रयच्या व्यवसायत पैसे लावण्यासाठी आणि गाडी घेऊन देण्यासाठी सांगितले.

सचिन वाझेला पुन्हा एकदा एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून वाढवायचा होता आपला दबदबा – NIA

२०१७ मध्ये, वाझेने महिलेला त्याच्या एका कंपनीमध्ये संचालक होण्यास सांगितले. ही कंपनी दुचांकींच्या सर्व्हिसिंगसाठी सुरु करण्यात आली होती. महिलेने दावा केला की तिने कंपनीमध्ये १७ लाखांची गुंतवणूक केली आहे, पण इतर दोन भागीदारांकडून पाठिंबा नसल्यामुळे व्यवसाय सुरू करता आला नाही. २०१९ वाझेने पुन्हा व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न केला. जानेवारी-फेब्रुवारी २०२० मध्ये, वाझेने कंपनीसाठी १५ लाखांच्या ३० इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केल्या. मात्र लॉकडाऊनमुळे कंपनीला नफा झाला नाही.

जून २०२० मध्ये, वाजेने त्या महिलेला एस्कॉर्ट म्हणून काम थांबवण्यास सांगितले कारण त्याला सेवेत पुन्हा घेण्यात आले होते. यानंतर, वाझेने ऑगस्ट २०२० पासून महिलेला ५०,००० प्रति महिना देण्यास सुरुवात केली. १८ आणि २० फेब्रुवारी रोजी या महिलेला दक्षिण मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वाझेला भेटताना पाहिले गेले. एनआयएने हॉटेलच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या स्कॅनिंग मशीनमधून समोर आलेल्या माहितीमध्ये त्याच्याकडे नोटांचे बंडल असल्याचे समोर आले होते.

प्रदीप शर्मांना देण्यात आली होती मनसुख हिरेनच्या हत्येची जबाबदारी; सचिन वाझेने दिली होती नोटांनी भरलेली बॅग

महिलेने एनआयएला सांगितले की १५ फेब्रुवारी रोजी तिने क्रॉफर्ड मार्केटजवळील वाझेच्या कार्यालयाला भेट दिली होती आणि त्याच्याकडून ४० लाख घेतले होते. नंतर १८ फेब्रुवारी रोजी पंचतारांकित हॉटेलमध्ये ती रक्कम परत केली. ती पुढे म्हणाली की वाझेने तिला त्यामधील ७८६ क्रमांक असलेल्या नोटा काढण्यास सांगितले होते. पुढे, १९ फेब्रुवारीला हॉटेलमधून बाहेर पडताना, महिलेने तिच्यासोबत ३६ लाख रोख घेतले आणि दुसऱ्या दिवशी ते वाझेला परत केले.

एनआयएला कंपनीच्या बँक खात्यात १.५ कोटी सापडले ज्यामध्ये ती संचालक होती. याबाबत विचारल्यावर, महिलेने एनआयएला सांगितले की कंपनीच्या खात्यात पैसे कोणी जमा केले हे फक्त वाझेच सांगू शकतात. तिच्या बँक खात्यातील ३९ लाखांबद्दल प्रश्न विचारल्यावर ती समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. मात्र सुरु केलेल्या कंपन्यामधून कोणतीही कमाई होत नसल्याचे या महिलेने सांगितले.

हे ही वाचा > ओबेरॉय हॉटेलमधील खोली १०० दिवस आरक्षित!

एनआयएला तपासात आढळले की तिने वाझेच्या अटकेनंतर पाच दिवसांनी १८ मार्च रोजी बँक लॉकरमधून ५ लाख रुपये काढले होते. महिलेने कथितरित्या पैसे तिच्या भावाला दिले.  तिला अटक झाल्यास एक चांगला वकील शोधण्यासाठी त्याला सांगितले. नंतर ती महिला आपल्या मुलासह बनारस येथे पळून गेली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman with sachin vaze five star hotel mumbai was escort nia abn
First published on: 09-09-2021 at 12:36 IST