मुंबईच्या चेंबूर परिसरात गुरूवारी अंगावर झाड पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. शारदा घोडेस्वार असे या मृत महिलेचे नाव आहे. शारदा घोडेस्वार येथील बसस्टॉपवर उभ्या असताना हा प्रकार घडला. यावेळी झाडाचा काही भाग त्यांच्या डोक्यावर कोसळला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर शारदा यांना जखमी अवस्थेत शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

VIDEO: मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचा अंगावर झाड पडून मृत्यू

या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यापूर्वी चेंबूरमध्ये जुलै महिन्यात कांचन नाथ या मॉर्निंग वॉकला गेल्या असताना त्यांच्या अंगावर नारळाचे झाड पडले होते. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यावेळी पालिकेने जोरदार वाऱ्यांमुळे झाड पडल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकली होती. मात्र, दुर्घटना घडली त्या परिसरातील चंद्रोदय सोसायटीचे रहिवासी अविनाश पोळ यांनी मुंबई महानगरपालिकेकडे या झाडाबाबतची तक्रार फेब्रुवारी महिन्यात केली होती. ते झाड कापण्याची फी १३८० रु. त्यांनी भरली होती. त्यावर पालिकेच्या पथकाने पाहणी करून झाड सुस्थितीत असून तोडण्याची गरज नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे कांचन यांच्या मृत्यूस पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप रहिवाश्यांनी केला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा अशाप्रकारची दुर्घटना घडल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women died in chembur by collapsing tree on her body
First published on: 07-12-2017 at 14:38 IST