मुंब्रा येथील रशिद कंपाउंडमधील  चार मजली ‘झीनत महल’च्या तळमजल्याचे छत शनिवारी सायंकाळी कोसळून शेबिया बानो शेख (२०) व तिच्या दोन लहान मुली जखमी झाल्या. उपचारादरम्यान त्यापैकी शिफा मोहम्मद इसाक या पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. समरिन (३) हिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही इमारत सुमारे २० वर्ष जुनी असून विशेष म्हणजे धोकादायक इमारतींच्या यादीत तिचा समावेश झाला नव्हता.