मुंबई : तब्बल दोन वर्षे करोना संसर्गाशी कडवी झुंज दिल्यानंतर धारावीचा परिसर अखेर करोनामुक्त झाला. धारावीतील उपचाराधीन रुग्णांची संख्या शून्य झाली असून गेल्या आठवडय़ाभरात धारावीत एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही.एकेकाळी मुंबईतील करोनाचा अतिसंक्रमित भाग असलेल्या धारावीतील उपचाराधीन रुग्णांची संख्या गेल्या महिन्याभरात वेगाने कमी होऊ लागली होती. मात्र एक दोन रुग्ण आढळत असल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या शून्यावर येत नव्हती. २४ मार्च रोजी धारावीतील उपचाराधीन रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धारावीत करोनाचा स्फोट होईल आणि मृतांची संख्या वाढेल भीती वर्तवली जात होती. मात्र, पालिकेने केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे धारावीत करोनाला थोपवण्यात यश आले आहे. धारावीत एकेकाळी दिवसाला १०० रुग्ण सापडत होते, पण पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या आटोक्यात आली. धारावीत आता करोनाचा एकही रुग्ण नाही. पहिल्या व दुसऱ्या लाटेतही उपचाराधीन रुग्णांची संख्या पाच ते सातपर्यंत खाली आली होती. मात्र त्यानंतर पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली होती. दोन वर्षांत प्रथमच धारावीत उपचाराधीन रुग्णसंख्या शून्यावर आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zero patients treatment dharavi patients after two years amy
First published on: 25-03-2022 at 00:58 IST