मृतांची संख्या १८; एकूण रुग्ण ११ हजारांवर

नागपूर : गुरुवारी एकाच दिवशी पुन्हा ७२७ नवे रुग्ण आढळले. याशिवाय १८ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा ४२० वर गेला असून एकूण बाधितांची संख्या ११ हजार ७०९ वर पोहचली आहे.

दिवसभरात १८ करोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून यामध्ये १ ग्रामीण, १६ शहर तर १ जिल्ह्याबाहेरील आहे. मेयोमध्ये एकूण ८ रुग्ण दगावले असून यामध्ये लालगंज येथील ४३ वर्षीय पुरुष, सदर येथील आजाद चौक येथील ६५ वर्षीय पुरुष, हिवरीनगर येथील ६२ वर्षीय माहिला, गांजाखेत येथील ७० वर्षीय महिला, बडकस चौक येथील ७३ वर्षीय महिला, तांडापेठ येथील ६६ वर्षीय पुरुष, विनोबा भावेनगर येथील ५७ वर्षीय पुरुष, गांधीबाग येथील ६२ वर्षीय महिलाही करोनामुळे दगावली.

आज गुरुवारी एकूण ७२७ नवे करोनाचे रुग्ण आढळले असून एकूण करोना बाधितांची संख्या ११ हजार ७०९ वर गेली आहे. दिवसभरात आढळलेल्या ७२७ नव्या करोना रुग्णांपकी ९२ ग्रामीण तर ६३५ शहरातील आहेत. ७२७ रुग्णांपकी १०३ करोना रुग्णांचा चाचणी अहवाल मेयोतून सकारात्मक आला आहे. मेडिकलमध्ये ९१ रुग्ण, एम्समध्ये ५६ रुग्ण, निरीतून ३२ रुग्ण, माफ्सूमधून ३८ रुग्ण, अ‍ॅन्टीजन चाचणीत ३०१ रुग्ण तर खासगी प्रयोगश करणात आहेत. एकूण ११ हजार ७०९ करोनाबाधितांपकी ३४६५ रुग्ण हे नागपूर ग्रामीणमधील असून २३५ रुग्ण जिल्ह्य़ाबाहेरील आहेत. सध्या मेडिकलमध्ये ३६७ रुग्ण  उपचार घेत असून मेयोत १८९, एम्समध्ये ३८, तर बाकी जिल्ह्यतील इतर रुग्णालयात दाखल आहेत. दिवसभरात १८९ करोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शहरात आजवर एकूण

५ हजार ५१६ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४७.११ एवढे आहे.