08 March 2021

News Flash

ब्रेडला थुंकी लावून ‘टिकटॉक’ व्हिडीओ करणाऱ्यांना अटक

या व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे

ब्रेडला थुंकी लावून त्याचा व्हिडीओ टिकटॉवर अपलोड करण्यात आल्याची धक्कादायक आणि तितकीच किळसवाणी घटना समोर आली आहे. अमरावतीमधील एका बेकरीत हा प्रकार घडला आहे. एकीकडे राज्यात करोनामुळे गंभीर परिस्थिती असल्याने सर्वतोपरी काळजी घेतली जात असताना या व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अचलपूर पोलिसांनी कारवाई करत तरुणाला अटक केली आहे. सोबत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

बुधवारी सायंकाळी बेकरीत ब्रेड कापून त्याला थुंकी लावतानाचा व्हिडीओ ‘टिकटॉक’वर अपलोड करण्यात आला होता. काही वेळातच हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर सर्वत्र टीका सुरू झाली होती. हे चित्रीकरण आपल्या बेकरीमधील असल्याचे कळताच बेकरी मालक मोहम्मद नासीर, अब्दुल सलाम यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत अब्दूल नाजीम शेख महमुद (वय २९) याला अटक केली असून एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 6:55 pm

Web Title: amravati police arrest after controversial tiktok video sgy 87
Next Stories
1 गडचिरोलीत पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीची डोक्यात गोळी घालून आत्महत्या
2 कर्मचाऱ्यांना दीडपट वेतन, किराणामाल अन् कुटुंबाचा खर्चही!
3 लोकजागर : ताटी उघडा ‘प्रशासना’!
Just Now!
X