News Flash

पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल

येत्या एक एप्रिलपासून बदल लागू होणार

(संग्रहित छायाचित्र)

येत्या एक एप्रिलपासून बदल लागू होणार

नागपूर : प्राप्तीकर विभागाने पॅन कार्डच्या नियमात तीन मोठे बदल केले आहेत. येत्या एक एप्रिलपासून हे बदल होणार आहेत. पॅन कार्ड आधार कार्डला अद्यपही लिंक केलेले नसेल तर अनेक अडचणी उद्भवू शकतात. आधारला पॅन न जोडल्यास आयटी कलम १३९(ए) अंतर्गत ते निष्क्रिय समजले जाईल.

प्रत्यक्ष कर संचालक मंडळांनी आधारला पॅन कार्ड लिंक करण्याची मर्यादा वाढवून ३१ मार्च २०१९ पर्यंत केली आहे. प्राप्तीकर विभागानुसार आर्थिक वर्षांत २.५ लाखाहून अधिकची पैशांची उलाढाल असल्यास पॅन कार्ड काढणे गरजेचे आहे. येत्या ३१ मे पर्यंत पॅन कार्डसाठी अर्ज करता येईल. नव्या पॅन कार्डवर अर्जदाराचे नाव, त्याच्या आईवडिलांचे नाव, जन्मतारीख आणि पॅन नंबरशिवाय क्यूआर कोडही असणार आहे. क्यूआर कोडमध्ये अर्जदाराचे छायाचित्र आणि स्वाक्षरीसोबतच इतरही माहिती पॅन कार्डवर उपलब्ध असणार आहे. ही माहिती डिजिटल साइंड आणि कोडेड राहील. पॅन कार्ड स्कॅन करुन देखील माहिती उपलब्ध करुन घेता येईल.

नव्या पॅन कार्डवर छायाचित्र, स्वाक्षरी, होलोग्राम आणि क्यूआर कोडची जागा बदलण्यात आली आहे. तो आता ई-पॅनमध्येही मिळेल. हा क्यूआर कोड विशेष भ्रमणध्वनी अ‍ॅपच्या माध्यमातून स्कॅन करता येईल. गुगल प्ले स्टोअरवरही ते उपलब्ध आहे. मात्र, हा कोड स्कॅन करण्यासाठी १२ मेगापिक्सल किंवा त्याहून अधिक चांगल्या कॅमेऱ्याची गरज आहे. नव्या डिझाईनमधील पॅन कार्ड आल्यानंतर सात जुलै २०१८ पूर्वी जारी करण्यात आलेले पॅन कार्डही कार्यरत राहणार आहेत. नवीन पॅनकार्डसाठी अर्ज करत असताना आईवडील घटस्फोटीत असल्यास वडिलांचे नाव देणे आता बंधनकारक असणार नाही. प्राप्तीकरण विभागाने एका अधिसूचनेच्या माध्यमातून प्राप्तीकरणाच्या नियमात संशोधन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 12:31 am

Web Title: changes in pan card rules
Next Stories
1 देशात काँग्रेस आघाडीचे सरकार येणार
2 भारतात धर्माचे विकृतीकरण: श्रीपाल सबनीस
3 महापालिका निवडणुकीतील बंडखोरांना मानाचे पान!
Just Now!
X