News Flash

विदर्भाच्या सुपुत्राने वॉकआऊट केला पण नातवाने न्याय दिला : प्रणिती शिंदे

आम्ही जे वचन दिलं ते पूर्ण केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचं थकीत कर्ज माफ करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. मार्च २०२० पासून ही योजना सुरू करण्यात येणार असून सर्व रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे. तसंच यासाठी कोणत्याही अटीशर्थी ठेवण्यात आल्या नसल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा केव्हा कोरा करणार असा सवाल केला. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. यावर बोलताना काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी विदर्भाच्या सुपुत्राने वॉकआऊट केला पण नातवाने न्याय दिला, असं वक्तव्य केलं. सुरूवातीला बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना मी विदर्भाचा नातू आहे. आजोळचे आशीर्वाद माझ्यासाठी महत्वाचे आहेत, असं म्हटलं होतं.

शेतकरी कर्जमाफीसंदर्भात एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसंच मार्च महिन्यापासून ही योजना सुरू करण्यात येणार आहे. सर्वांचे डोळे लागून राहिले होते, अशी कर्जमाफीची घोषणा आज करण्यात आली. यासाठी कोणत्याही अटी-शर्थी ठेवण्यात आलेल्या नाहीत. आम्ही जे वचन दिलं ते पूर्ण केलं. ही केवळ सुरूवात आहे. आम्ही जेवढी वचनं दिली ती सर्व पूर्ण करणार आहोत, असं प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक आदर आहे. ते सभागृहातही सर्वांशी हात जोडून बोलत होते. त्यांनी सभागृहात काही गोष्टींवरून विरोधकांची माफीही मागितली. एवढीच इतरांप्रती आदराची भावना जर विरोधकांमध्ये असती तर आज कदाचित आम्ही विरोधकांच्या जागी बसलो असतो असंही त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचं थकीत कर्ज माफ करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. मार्च २०२० पासून ही योजना सुरू करण्यात येणार असून सर्व रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे. तसंच यासाठी कोणत्याही अटीशर्थी ठेवण्यात आल्या नसल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. यानंतर विरोधकांनी शेतकऱ्यांचा सातबारा केव्हा कोरा करणार असं विचारत सभात्याग केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2019 6:01 pm

Web Title: congress mla praniti shinde speaks about cm uddha thackeray speech vidhan sabha winter session nagpur jud 87
Next Stories
1 गोरगरीबांसाठी १० रूपयांत शिवभोजन योजना; मुख्यमंत्र्यांची माहिती
2 सुरक्षेसाठी ताडोबातील वाघांचे स्थलांतर
3 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची नवीन पद्धत रद्द
Just Now!
X