News Flash

फडणवीस-गडकरी भागवतांना भेटले 

गडकरी वाडय़ावरून संघ मुख्यालयात पोहोचले. तेथे चर्चा झाली.

फडणवीस-गडकरी भागवतांना भेटले 
देवेंद्र फडणवीस

केंद्र आणि राज्याच्या मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार आणि उत्तरप्रदेशात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या राज्यातील भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी रविवारी सरसंघचालक  डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, दोन्ही नेते वेगवेगळे सरसंघचालकांना भेटले.नागपूरच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठकीला फडणवीस आणि गडकरी  रविवारी नागपुरात आले होते.   मुख्यमंत्री रेशीमबागेतील स्मृती मंदिरात पोहोचले. तेथे संघाचा प्रशिक्षण वर्ग सुरू आहे.  मुख्यमंत्र्यांनी यावेळी भागवत यांच्याशी चर्चा केली. दरम्यानच्या काळात सरसंघचालक महालमधील संघ मुख्यालयात आले. गडकरी वाडय़ावरून संघ मुख्यालयात पोहोचले. तेथे चर्चा झाली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2016 2:13 am

Web Title: devendra fadnavis and nitin gadkari
Next Stories
1 केंद्राचा पंचायतराज गुंडाळण्याचा घाट!
2 ‘उडता पंजाब’वरून टीका प्रसिद्धीसाठी पहलाज निहलानी यांची टीका
3 दोघा भावांच्या उपस्थितीत रवींद्र सावंतचे शवविच्छेदन
Just Now!
X