25 February 2021

News Flash

शहरात चार महिन्यांतील बाधितांचा उच्चांक!

शहरात ७ ऑक्टोबर २०१९ रोजी ७६३ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होऊ लागली.

संग्रहीत

तब्बल ६४१ नवीन रुग्ण आढळले; जिल्ह्यात एकूण आठ रुग्णांचा मृत्यू

नागपूर : जिल्ह्यात २४ तासांत ८ करोनाबाधितांचा मृत्यू व  ७१० नवीन रुग्णांची भर पडली. नवीन बाधितांत शहरातील ६४१ रुग्णांचा समावेश आहे. हा गेल्या चार महिन्यातील शहरातील दैनिक करोनाबाधितांचा उच्चांक आहे.

शहरात ७ ऑक्टोबर २०१९ रोजी ७६३  रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होऊ लागली.  आता पुन्हा करोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. १९ फेब्रुवारी २०२० रोजी शहरात तब्बल ६०३ रुग्णांची नोंद झाली होती.  सोमवारी शहरात ६४१ रुग्णांची नोंद झाली. ग्रामीणला ६७, जिल्ह्याबाहेरील २ व शहरातील मिळून एकूण ७१० रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या १ लाख १४ हजार ८६९, ग्रामीण २८ हजार ४६, जिल्ह्याबाहेरील ९२८ अशी एकूण १ लाख ४३ हजार ८४३ रुग्णांवर पोहोचली आहे.  दिवसभरात शहरात ४, ग्रामीण २, जिल्ह्याबाहेरील २ असे एकूण ८ मृत्यू झाले. त्यामुळे आजपर्यंतच्या शहरातील मृत्यूची संख्या २,७७१, ग्रामीण ७६६, जिल्ह्याबाहेरील ७४६ अशी एकूण ४,२८३ रुग्णांवर पोहोचली आहे.  दिवसभरात शहरात ४००, ग्रामीणला ३७ असे एकूण ४३७ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या १ लाख ६ हजार ९२९, ग्रामीण २६ हजार ३६९ अशी एकूण १ लाख ३३ हजार २९८ व्यक्तींवर पोहोचली आहे.

सकारात्मक अहवालाचे प्रमाण वाढले

शहरात सोमवारी दिवसभरात ५,९३८, ग्रामीणला १,४५८ अशा एकूण ५ हजार ९३८  चाचण्या झाल्या.  रविवारी चाचण्या झालेल्या ६,३३५ चाचण्यांतील ७१० नवीन बाधित आढळल्याने चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण ११.२० टक्के नोंदवले गेले. मध्यंतरी हे प्रमाण ६ ते ७ टक्क्यांवर होते. आता ते पुन्हा वाढले आहे.

गंभीर रुग्णांची संख्या अकराशेवर

सोमवारी शहरात एकूण ५,१६९, ग्रामीणला १,०९३ असे एकूण ६,२६२ सक्रिय रुग्ण नोंदवले गेले. यापैकी  विविध रुग्णालयांत दाखल गंभीर रुग्णसंख्याही १,०९९ रुग्णांवर गेल्याने चिंता वाढली आहे. गृहविलगीकरणात ४,४५३ रुग्णांवर उपचार  सुरू  आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 12:01 am

Web Title: highest number of victims in the city in four months akp 94
Next Stories
1 भूमिगत वीज वाहिनीसाठी नवीन रस्त्यांची तोडफोड
2 जेईई मुख्य परीक्षेचा २३ ते २६ फेब्रुवारीदरम्यान पहिला टप्पा
3 शिष्यवृत्तीच्या तरतुदीत यंदा सतराशे कोटींची घट
Just Now!
X