• शालेय, महाविद्यालयीन तरुणाईला विळखा
  • अंबाझरी, सदर, बजाजनगर, एमआयडीसी पोलीस ठाण्यांची मेहेरनजर

स्वच्छ प्रतिमेचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी ‘ड्रग फ्री नागपूर’चा नारा दिला असता त्यांचे कनिष्ठ अधिकारी व पोलीस ठाण्याचे अधिकारी त्यांच्या मोहीमेला हरताळ फासत असल्याची बाब समोर आला आहे. अंमली पदार्थाच्या नादी लावण्यासाठी कारणीभूत ठरणारे हुक्का पार्लर शहरातील अंबाझरी, सदर, बजाजनगर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्रासपणे चालत आहे. शहरातील शालेय व महाविद्यालयीन तरुणाई हुक्का पार्लरच्या आहारी गेली आहे.

महाविद्यालयीन तरुणांना अंमली पदार्थाच्या व्यसनाने ग्रासले आहे. आता शाळकरी मुलेही त्याच मार्गावर जात असून त्यांची सुरुवात हुक्का पार्लरपासून होते. हुक्का अंमली पदार्थ नसल्याचा दावा हुक्का पार्लर चालविणाऱ्यांकडून केला जातो. मात्र, एकप्रकारे ते नशा करण्याचेच माध्यम आहे. शाळकरी मुले व महाविद्यालयीन तरुण हुक्का पार्लरच्या आहारी जात आहेत.

20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या

ते वर्ग बुडवून हुक्का पार्लरमध्ये हुक्का पित बसल्याचे दिसून येतात. त्यामुळे या पार्लरवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. ही समस्या राज्यातील अनेक शहरांना भेडसावत असून त्यासंदर्भात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार मंगलप्रभात लोढा यांनी खासगी अधिवेशन मांडून या बाबीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. नागपुरातही मोठय़ा प्रमाणात हुक्का पार्लर सुरू असून सर्वाधिक हुक्का पार्लर अंबाझरी, सदर, बजाजनगर, एमआयडीसी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आहेत. हुक्का पार्लरवर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अर्थकारण जुळले असल्याने कुणावरही कारवाई करण्यात येत नाही.

पोलीस ठाण्यानुसार हुक्का पार्लर

अंबाझरी पोलीस ठाण्यांतर्गत वाईब, गुडगुड, कोपा, कर्बस्टोन, स्पॉट ९, नवाब, फिरंगी, विला ६५, एसआर, स्पीडस, सदर पोलीस ठाण्यांतर्गत हॉब फार्मिशन, एमआर, चिल अ‍ॅण्ड ग्रिल, कार्नेशन, बजाजनगरमध्ये के हिल्स, एमआयडीसीमध्ये वेअरहाऊस हे हुक्का पार्लर सुरू आहेत. त्यांच्याशिवाय अनेक हुक्कापार्लर सुरू असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कायद्यानुसार कारवाई

कायद्यांतर्गत पोलिसांना असलेल्या अधिकारांतर्गत शहरातील हुक्का पार्लरवर यापूर्वी कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतरही शहरात हुक्का पार्लर सुरू असतील, तर त्यांच्यावर पुन्हा कारवाई करण्यात येईल. तरुणाईला अंमली पदार्थाचा विळखा घालणारे हुक्का पार्लर खपवून घेतले जाणार नाही.

संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.