News Flash

मेडिकलमध्ये ‘कौशल्य प्रशिक्षण’ घोटाळा उघडकीस

या घटनेने मेडिकलच्या शैक्षणिक गुणवत्तेवरच गंभीर प्रश्न निर्माण केले आहे.

मेडिकलमध्ये ‘कौशल्य प्रशिक्षण’ घोटाळा उघडकीस
मेडिकलमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता २०० असून येथे महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातून मोठय़ा संख्येने विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता येतात.

महिनाभराचे प्रशिक्षण आठवडाभरात पूर्ण; प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांकडून वसुली
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात एक महिना कौशल्य प्रशिक्षण आवश्यक असताना आठवडाभरातच हे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जात आहे. यासाठी काही अधिकारी व कर्मचारी विद्यार्थ्यांकडून मोठय़ा प्रमाणावर अवैध वसुली करीत असल्याचे उघडकीस आले आहे. पूर्णवेळ प्रशिक्षण करायला तयार असलेल्यांनाही ते करू दिले जात नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. या घटनेने मेडिकलच्या शैक्षणिक गुणवत्तेवरच गंभीर प्रश्न निर्माण केले आहे.
मेडिकलमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता २०० असून येथे महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातून मोठय़ा संख्येने विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता येतात. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या ‘एमबीबीएस’ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांला शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून एक वर्षे आंतरवासिता करणे आवश्यक आहे. यामध्ये ११ महिने मेडिकलच्या विविध विभागांत तर एक महिना ग्रामीण भागात काम करावे लागते.
आंतरवासिता पूणविद्यार्थ्यांला एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण झाल्याचे कंम्प्लायन्स प्रमाणत्र मिळते. कंम्प्लायन्स प्रमाणपत्रावरून आरोग्य विद्यापीठ विद्यार्थ्यांला पदवीची डिग्री देत असून विद्यार्थ्यांला वैद्यकीयचे रजीस्ट्रेशनही मिळते. इंट्रनशीपच्या कालावधीत विद्यार्थ्यांला स्वत रुग्णसेवा द्यावी लागत असल्याने त्याला वैद्यकीयचे प्रत्यक्ष ज्ञान मिळते. इंट्रनशीलमध्ये विद्यार्थ्यांला रुग्णांना इंजेक्षण देणे, सलाईन लावणे, रक्ताचे नमूणे घेणे, रुग्णाचे डायेट चार्ट तायर करणे, तोंडातून पोटात टय़ूब टाकणे, रुग्णाची हिस्ट्री तयार करणे, रुग्णात कॅथरेटर टाकणे, रुग्णाचे मधूमेह व रक्तदाब तपासणीसह सगळ्या बाबी शिकवल्या जातात.
कौशल्य प्रशिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधणे शिकायला मिळते. या प्रशिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असताना मेडिकलमध्ये या प्रक्रियेशी खेळ सुरू असल्याचे दिसत आहे. नुकतेच मेडिकलमध्ये पैसे देऊन विद्यार्थ्यांना ११ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण पुढे आले होते. त्यात चौकशीच्या दरम्यान एक विभागप्रमुख वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. मेडिकलमध्ये प्रशिक्षण कालावधी पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पदव्युत्तर प्रवेशाबाबदचा नवीन घोळ पुढे आला होता. प्रशासनाने विद्यार्थ्यांकडून त्यांना मिळालेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रवेशानंतर आंतरवासिता करण्याच्या हमीपत्रावर त्यांना प्रमाणपत्र दिले होते.
या घटनेनंतरही प्रशासनात सुधारणा झाली नसल्याचे दिसत आहे. सावनेरमध्ये विद्यार्थ्यांना केवळ आठवडाभर प्रशिक्षण करून महिनाभराचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहे. विद्यार्थ्यांना येथून इतरत्र बदलून गेलेल्या मेडिकलचा एक अधिकारी दूरध्वनी करून त्याच्या नागपूर येथील घरी रक्कम पोहोचवून देण्यास सांगतो. ती न दिल्यास प्रमाणपत्र दिली जाणार नसल्याचे सांगितले जाते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
एमबीबीएस पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांचा कल ‘एमडी’ व ‘एमएस’सह विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांकडे असतो. यासाठी प्रवेशपूर्व परीक्षा महत्त्वाची असल्याने विद्यार्थीही चुकीच्या मार्गाने पैसे देऊन या गैरमार्गाकडे वळत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार सांगतात. परंतु या प्रश्नावर मेडिकल प्रशासनाने तोडगा काढण्याची गरज आहे.
प्रकरणाची चौकशी करणार -डॉ. निसवाडे
मेडिकलच्या आखत्यारीत असलेल्या सावनेर आरोग्य केंद्रात विद्यार्थ्यांकडून गैरमार्गाने काही अधिकारी पैसे घेत असल्याच्या तक्रारी कानावर आहे. त्याची चौकशी केल्या जाईल. दरम्यान, प्रशासनाने सावनेर आरोग्य केंद्राच्या सूचना फलकावर असल्या प्रकारे विद्यार्थ्यांना कुणी पैशाची मागणी केल्यास त्यांनी लाचलूपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करण्याची नोटीस लावली आहे. महिनाभर प्रशिक्षण पूर्ण करण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, म्हणून प्रशासन खबरदारी घेईल, असे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2015 4:49 am

Web Title: in medical to expose skills training scam
Next Stories
1 महालेखाकार कार्यालयातर्फे दीक्षाभूमीवर दालन
2 ‘नॅरोगेज’ मार्ग बंद, कर्मचारी कामाविना स्थानांतरण कोठे, कर्मचारी संभ्रमात
3 अंगणवाडीसेविकांकडे निवडणुकीची कामे, आरोग्य व शिक्षणाच्या कामालाच हरताळ
Just Now!
X