News Flash

घोडे, तोफा आणि आतषबाजीत राणी लक्ष्मीबाईंचा जीवनपट उलगडला

खासदार सांस्कृतिक महोत्सवात दमदार सादरीकरण

खासदार सांस्कृतिक महोत्सवात दमदार सादरीकरण

नागपूर : विवाहाच्या वेळी झालेली फटाक्यांची आतषबाजी, रणभूमीवर पाठीला मूल बांधून घोडय़ावर युद्धासाठी सज्ज झालेली महाराणी लक्ष्मीबाई आणि तोफांच्या गर्जनामध्ये युद्धाच्या थराराने ईश्वर देशमुख महाविद्यालयाचा परिसर दुमदुमून गेला. राणी लक्ष्मीबाईंचा जीवनपट उलगडताना त्यांची भावविभोर करणारी कथा नागपूरकरांनी अनुभवली.  ‘झांशी की राणी – रणरागिणी’ हे नाटय़ आज मंगळवारी खासदार सांस्कृतिक  महोत्सवात सादर करण्यात आले. सहाय्य फाऊंडेशनने ते प्रस्तुत केले.

मोरोपंत तांबे यांची मुलगी मनकर्णिका म्हणजेच मनूचे बालपण, त्यावेळचे तिचे धाडस,  तिचे साहसी विचार, निर्णय क्षमता अशा विविध प्रसंगाद्वारे रणरागिणीचा जीवनपट यावेळी सादर करण्यात आला. ‘एक हत्तीच काय असे अनेक हत्ती माझ्या राज्यात राहतील, मी राणी होईल’ असे ती म्हणते. मराठी, हिंदी, संस्कृती, शास्त्र विद्या अशा विविध प्रकारच्या निपुण असलेल्या मनूचा विवाह होतो. राजयोग असलेल्या मनूच्या भाग्यात झाशीची राणी होणे लिहिलेले असते. १८५७ च्या उठावातील तिचे शौर्य  कळस बिंदू ठरते. मेरी झांशी नही दुंगी अशी गर्जना होताच मैदानात टाळ्यांचा कडकडाट झाला. या नाटकाचे सूत्रधार बालनाटय़ निर्माते संजय पेंडसे होते. निर्मिती इंद्रनील कायरकर यांची होती. लेखन गौरव खोंड यांनी केले होते. दिग्दर्शन नचिकेत म्हैसाळकर यांनी केले.  या महानाटय़ात राणी लक्ष्मीबाईची भूमिका राधिका पेंडसे – देशपांडे यांनी केली, तर गंगाधररावांच्या भूमिकेत विपुल साळुंके होते. बाजीराव पेशव्यांची भूमिका देवेंद्र दोडके तर लक्ष्मीबाईचे वडील मोरोपंत यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे यांनी केली. मुख्?य शाहिराच्या भूमिकेत अभिनेते सुशांत शेलार होते. प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे, महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 4:02 am

Web Title: jhansi chi rani drama at khasdar sanskritik mahotsav in nagpur
Next Stories
1 महापालिका नुसती नोटीसच बजावणार का?
2 स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन तब्बल महिनाभर उशिराने
3 पाच महिन्यांत सिलेंडर १२० रुपयांनी महागले
Just Now!
X