पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून ग्रामीण भागात शेतीसाठी मुठा उजवा कालव्यातून पाणी सोडण्यासाठी जलसंपदा विभागाने दुसरे उन्हाळी आवर्तन घ्यायचे किं वा कसे, याबाबतचा निर्णय मंगळवारी घेण्यात येणार आहे. सध्या धरणांमधील मुबलक उपलब्ध पाणीसाठा पाहता दुसरे आवर्तन घेतले जाण्याची दाट शक्यता आहे.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या चारही धरणांमध्ये १३.७२ अब्ज घनफू ट (टीएमसी) म्हणजेच ४७.०७ टक्के  पाणीसाठा आहे. सध्या खडकवासला धरणातून कालव्याद्वारे ग्रामीण भागाला शेतीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. या पहिल्या सिंचन आवर्तनाची मुदत २० एप्रिल रोजी संपत आहे. सद्य:स्थितीत खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीचोरी व गळती, बाष्पीभवन होऊनही पुरेसा पाणीसाठा धरणांमध्ये पावसाळ्यापर्यंत शिल्लक राहणार आहे. या पार्श्वभूमीवर दुसरे उन्हाळी आवर्तन १० जूनपर्यंत घेण्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, रब्बी हंगामासाठी डिसेंबर २०२० ते फे ब्रुवारी २०२१ या कालावधीत कालव्यातून शेतीसाठी ३.२९ टीएमसी पाणी सोडण्यात आले. १ मार्चपासून पहिले उन्हाळी आवर्तन सुरू आहे. या आवर्तनात पाच टीएमसी पाणी शेतीसाठी देण्यात आले आहे. दुसऱ्या आवर्तनात तीन टीएमसी पाणी देण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे. धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा टीएमसी टेमघर ०.४५ (१२.१५), वरसगाव ६.३८ (४९.७५), पानशेत ६.५३ (६१.३२) आणि खडकवासला ०.३६ (१८.३२)

(कंसात टक्क्यांमध्ये)