कवि कालिदास संस्कृत विद्यापीठात ‘प्राकृत शिलालेख साहित्य व ब्राह्मी लिपीचे योगदान’ या विषयावरील व्याख्यान पार पडली. विद्यापीठातील संस्कृत आणि संस्कृतेतर भाषा विद्याशाखेंतर्गत संस्कृत भाषा आणि साहित्य विभागातर्फे दरवर्षी प्राकृत साहित्याधारित दोन विशेष व्याख्याने आयोजित करण्यात आली. पहिले व्याख्यान सहा ऑक्टोबरला नागपुरातील शैक्षणिक परिसरात पार पडले.

‘भारतीय वाङ्मयास प्राकृत शिलालेख साहित्य व ब्राह्मी लिपीचे योगदान’ असा होता. प्रमुख व्याख्याने म्हणून सोलापूर येथील वालचंद कला महाविद्यालयातील संस्कृत प्राकृत विभागाचे प्रमुख डॉ. महावीर प्रभाचंद्र शास्त्री उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख प्रा. कविता होले होत्या. व्याकरण विभागातील डॉ. शिवराम भट आणि साहित्य विभागातील डॉ. पराग जोशी, समन्वयक डॉ. राजेंद्र जैन विशेषत्वाने उपस्थित होते. प्रास्ताविक प्राकृत आगम पदविकाचे समन्वयक डॉ. राजेंद्र जैन यांनी केले. डॉ. महावीर शास्त्री यांनी प्राकृत भाषा व साहित्यावर प्रकाश टाकून प्राकृत भाषेतील शिलालेख साहित्याचा विशेषत्वाने परामर्श घेतला. तसेच ब्राह्मी लिपीचा उगम, विकास व योगदानाचे विवेचन केले. डॉ. पराग जोशी यांचे भाषण झाले. प्रा. होले यांनी प्राचीन साहित्याला उजागर करणाऱ्या प्राकृत भाषा व साहित्यावर तसेच विशेषत्वाने लिपींवर संशोधन करण्याची व पाठय़क्रम निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. पराग जोशी यांनी आभार मानले. विद्याथी, संशोधक आणि प्राध्यापक यावेळी उपस्थित होते.