एमबीबीएस प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाच्या ज्या परीक्षा करोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्या जूनच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जातील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली. करोनाचा आढावा घेण्यासाठी नागपुरात आले असता ते माध्यमांशी बोलत होते. राज्यात पदव्युत्तर संवर्गातील एमडीची परीक्षा घेतली आहे. मात्र करोनामुळे एमबीबीएसच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या काळजीपोटी पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. आता त्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे नियोजन आहे. नागपुरातही करोनास्थिती सुधारत असल्याचा दावा देशमुख यांनी केला. राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर लसीकरणासाठी तयारी सुरू केली आहे. परदेशातून लस आणण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्ना आहेत, असेही अमित देशमुख म्हणाले.