News Flash

‘मेडिकल’मध्ये डायलिसिस अद्यापही सुरु नाही

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन काही वर्षांपूर्वी मेडिकलमध्ये डायलेसिस सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या, परंतु अद्यापही ते सुरू झाले नाही.

 

सर्वसामान्य रुग्णांना फटका

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन काही वर्षांपूर्वी मेडिकलमध्ये डायलेसिस सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या, परंतु अद्यापही ते सुरू झाले नाही. हाफकीनला तीन हिमोडायलेसिस यंत्र खरेदीच्या सूचना केल्यावरही ते यंत्र न मिळाल्याने ही स्थिती उद्भवल्याचे मेडिकले अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

मूत्रपिंडाच्या रुग्णांवर डायलेसिसची सुविधा सुपरस्पेशालिटी रुग्णालयात आहे. परंतु तिथे दुपारी २ नंतर रुग्ण घेतले जात नाही. त्यामुळे इतर वेळेत आलेल्या रुग्णांना मेडिकलमध्ये दाखल केले जाते. मेडिकलमध्ये रुग्ण अत्यवस्थ झाल्यास त्याला केव्हाही डायलेसिसची गरज भासते. त्यामुळे रात्रभर येथे रुग्ण तडफडत असला तरी त्याला दुसऱ्या दिवशी सुपरला पाठवूनच डायलेसिसची करण्याशिवाय पर्याय नसतो.   मेडिकलच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी लवकरच ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचा दावा केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 2:34 am

Web Title: medical dialysis akp 94
Next Stories
1 आमदार भोयर यांना वातावरण अनुकूल नसल्याचा अहवाल संघाच्या नावे व्हायरल, पोलिसांत तक्रार
2 विदर्भाच्या मुद्याने काँग्रेसला गतवैभव मिळवणे शक्य
3 विदर्भात भाजपला शह देण्याचे काँग्रेस आघाडीपुढे आव्हान
Just Now!
X