नागपूर : एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. यातून गर्भवती झालेल्या मुलीचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
रुपेश ऊर्फ फाटा संतोष उईके (२०) रा. इंदिरानगर असे आरोपीचे नाव आहे. पीडित १६ वर्षीय मुलीच्या वडिलांचे तिच्या लहानपणीच निधन झाले होते. ती आई व दोन भावांसह राहात होती. आई व भाऊ मजुरी करायचे. आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. गेल्या वर्षभरापासून तो तिच्यावर अत्याचार करीत होता. तिने नकार दिला असता आई व भावांना जीवे मारण्याची धमकी देत होता.
यातून तिला गर्भधारणा झाली. तिने २१ फेब्रुवारीला घरीच एका मृत बाळाला जन्म दिला. यादरम्यान तिची अचानक प्रकृती खालावली. त्याच दिवशी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान २२ फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी नोंदवलेल्या मुलीचा जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 25, 2020 2:31 am