अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि दिवाळी अंक ही केवळ मराठी माणसाची खासीयतच नव्हे तर संस्कृतीचे संचित आहे. प्रत्येकासाठी आणि कुटुंबातील सर्वासाठी दिवाळी अंकांचा खजिना दिवाळीच्या दरम्यान उपलब्ध होतो. मनोरंजनासाठी, वैचारिक खाद्य म्हणून किंवा वेळ घालवण्यासाठी दिवाळी अंकांचे वाचन असते. दिवाळीच्या काही दिवस आधी दिवाळी अंकांवर वाचकांच्या उडय़ा पडतात. सर्वच अंक विकत घेता येत नाहीत, म्हणून दिवाळी अंकांची देवाणघेवाणही असते.
बाजारात आजच्या घडीला २००च्यावर दिवाळी अंक उपलब्ध आहेत. त्यात गंभीर वैचारिक विषय, राजकारण, धार्मिक, आरोग्य, भटकंती, ज्योतिष, पाककृती, सौंदर्यप्रसाधने, विनोद आदी विषयांना वाहिलेले दिवाळी अंक आहेत. स्वत:चे वेगळे वैशिष्टय़ राखून असलेले दिवाळी अंकही आहेत. नाती जोडणारे मासिक म्हणून प्रसिद्ध असलेले ‘श्री व सौ’, सांस्कृतिक समृद्धी अधिक दृढ करणारे ‘अंतर्नाद’, वैचारिक धीरगंभीर चर्चा घडवून आणणारे ‘मौज’ आदी नामवंत दिवाळी अंक नामवंत लेखकांच्या कथा, कवितांसह उपलब्ध आहेत. उपासना विशेषांक ‘भाग्यनिर्णय’, संपूर्ण ज्योतिषविषयक ‘ब्रम्हज्ञान’, ‘ज्योतिष’, ‘शुभंकर’ आदींसारखे दिवाळी अंक धार्मिक वाचकांसाठी उपलब्ध आहेत.
चालू घडामोडींचा प्रभाव दिवाळी अंकांवर असतोच. महागाई, डाळींच्या भाववाढीचे गौडबंगाल, शिक्षणाचे खासगीकरण असे विषय यानिमित्ताने चर्चिले जात आहेत. पाककृतीवरील अंक दिवाळीत मोठय़ा संख्येने खपतात. ‘रुचिरा’, ‘शतायुषी’ बरोबरच चाळीशी नंतरचा आहार सांगणारे ‘चटपटीत’, आरोग्य व आहार विशेष आणि आरोग्याची काळजी घेणाऱ्या पाककृती तसेच अनेक आजारांवर उपचार सांगणारे ‘शतायुषी’ वाचकांच्या प्रतीक्षेत आहेत.
शृंगारिक, प्रणय मसिक ‘रोमिओ’ हे खास कामजीवन, प्रणयदर्शन आणि वात्रटिकांवर आधारित आहे. तसेच आंबट-शौकिनांचा कल लक्षात घेऊन ‘आवाज’, ‘जत्रा’ हे विनोदी दिवाळी अंक आलेले आहेत. पर्यटन, प्रवास, देशाटन अशा विषयांना वाहिलेले ‘भटकंती’, ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकांची स्वत:ची वेगळी शैली उठून दिसते. याशिवाय खास महिलांसाठी दिवाळी अंक बाजारात उपलब्ध आहेत.
काहीसे हटके, लक्ष वेधक दिवाळी अंक त्यांच्या वेगळेपणामुळे उठून दिसतात. त्यामध्ये जंबो शब्दकोडी असलेले ‘फूल टाईमपास’, धमाल शब्द कोडी आणि वाचनाचा आनंद देणारे ‘फूल मनोरंजना’सारखे दिवाळी अंक वाचकांसाठी ‘टाईमपास’ आहेत. केवळ मोठय़ांसाठीच नव्हे तर लहानांचाही विचार दिवाळी अंकात होतो बरे! दिवाळी अंकांची कमीत कमी किंमत ३० रुपये तर जास्तीत जास्त २०० रुपये आहे. अद्यापही अनेक दिवाळी अंक यायचे बाकी आहेत. युवावर्गात पाहिजे तशी दिवाळी अंकांची क्रेझ दिसत नाही. दिवाळी अंक ज्येष्ठ नागरिकांच्या आवडीचा विषय असतो. पण त्यांनाही हल्लीचे दिवाळी अंक आवडत नाहीत. ते अनिल अवचट किंवा जीएंसारख्या लेखकांना पसंत करतात.
नवीन लेखकांना ते पसंती देत नसल्याने पूर्वी १०च्यावर दिवाळी अंक खरेदी करणारे हल्ली तीन किंवा चार दिवाळी अंकातच समाधान मानतात. त्यातही ते मौज, अंतर्नाद, सत्याग्रह, साधनाचे अंक खरेदी करतात. यंदा आश्चर्य म्हणजे बाजारात अनेक ठिकाणी दिवाळी अंक उपलब्ध असताना पाहिजे तशी गर्दी झालेली नाही.
विदर्भात अक्षरवैदर्भी, आकांक्षा, मुलांचे मासिक, साहित्य विहार, केशव प्रकाश सारखे दिवाळी अंक प्रकाशित होतात. दिवाळी अंकाची परंपरा ‘लोकसत्ता’नेही कायम राखली आहे. तीन पिढय़ांनी जपलेला कलेचा वारसा लोकसत्ता विदर्भरंग दिवाळी अंकात अंकित करण्यात आला आहे.

kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
Bacchu kadu and navneet rana
“मोठे भाऊही म्हणता, माफीही मागता, तुमच्या एवढा लाचार माणूस…”; बच्चू कडूंची रवी राणांवर बोचरी टीका