19 December 2018

News Flash

जुन्या एस.टी. बसेस होणार अधिक ‘स्मार्ट’

एसटीच्या बसमध्ये सुधार करून तिची उंची सुमारे ६ इंचने वाढवण्यात आली आहे.

जुन्या एस.टी. बसेस

खासगी बसच्या धर्तीवर बदल; नागपूरच्या कार्यशाळेत काम सुरू

रस्त्यावरून धावताना होणारा आवाज, जंगलेली पत्रे, तुटलेली खिडक्यांची तावदाने, असे मरगळलेले जुन्या एस.टी. बसचे रूप आता कालांतराने बदलणार आहे. खासगी बसेसच्या स्पर्धेत आता एस.टी.ही स्मार्ट होणार असून त्यासाठी महामंडळाने प्रयत्न सुरू केले आहे.

चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य प्रवाशांचे वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून एसटीकडे बघितल्या जात होते. मात्र खासगी बसेसचा सुळसुळाट झाल्याने प्रवाशी टप्प्याटप्प्याने एस.टी.कडे पाठ फिरवू लागले आहेत. दूर गेलेल्या प्रवाशांना पुन्हा एस.टी.कडे आकर्षित करण्याकरिता नवीन योजना आखली आहे. त्याअंतर्गत महामंडळाच्या जुन्या  बसमध्ये बदल केले जाणार आहे. नागपूरच्या हिंगणा मार्गावरील कार्यशाळेत एक बस अद्यावत करणासाठी आली आहे. या बसचे अ‍ॅल्युमिनिअमचे पत्रे बदलून लोखंडी पत्रे लावली जात आहे. आसन व्यवस्थाही खासगी बसप्रमाणे होणार असून आरामदायी खुर्च्या लावल्या जात आहे.

जुन्या खिडक्यांऐवजी स्लाईडिंग, काच आणि अंतर्गत विद्युत रचनेत बदल, आकर्षक रंगरंगोटी करण्यात येणार आहे. हे सर्व बदल करताना बसच्या एकूण डिझाईनमध्येच बदलणार त्यासाठी संबंधित संस्थेची मंजुरी घ्यावी लागणार आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर इतरही बसेसमध्ये हा प्रयोग केला जाईल.

बसची उंची ६ इंचीने वाढवली

एसटीच्या बसमध्ये सुधार करून तिची उंची सुमारे ६ इंचने वाढवण्यात आली आहे. या बसच्या वरील सामान ठेवण्याची व्यवस्था काढून त्याला ट्रॅव्हल्स प्रमाणे मागून खालच्या बाजूला डिक्की दिल्या जात आहे. त्यामुळे प्रवाशांचे सामानही सुरक्षित राहण्यास मदत होईल.

First Published on November 14, 2017 3:20 am

Web Title: old st buses in nagpur will become more smart