वर्धा : निवडणूक कार्यालयाने उद्या, २६ एप्रिलच्या मतदानासाठी येणाऱ्या स्तनदा मातांसाठी शेकडो हिरकणी कक्षाची स्थापना केली आहे. विविध गटातील मतदारांना सोयीचे ठरावे म्हणून निवडणूक कार्यालयाने उपायोजना केल्या आहे. स्तनदा मातांसाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून ग्रामीणभागात ३२ आयुष्यमान आरोग्य मंदिर, १८३ आरोग्य वर्धीनी केंद्र तसेच ३४ केंद्रात हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उष्माघात झालेल्या रूग्णांना तात्काळ उपचार मिळावे म्हणून यासर्व केंद्रात शीतकक्षाचीसुद्धा स्थापना करण्यात आली आहे. मतदाराची अचानक प्रकृती बिघडल्यास उपचारासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर आशा स्वयंसेविका यांच्याकडे प्रथमोचार किट उपलब्ध राहणार आहे.

मतदान केंद्रावर पेयजल, प्रतिक्षा शेड, वैद्यकिय किट, रॅम्प, व्हिलचेयर, मानकचिन्हे, स्वतंत्र रांगेची ज्येष्ठांसाठी सुविधा तसेच मतदान केंद्रावर स्वयंसेवक सहायकसुध्दा उपलब्ध असणार आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी साडे पाच वाजता मतदान केंद्रावर अभिरूप मतदान घेतल्या जाणार आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींची उपस्थिती अपेक्षीत आहे. वर्धा मतदारसंघात १८ ते १९ वयोगटातील २५ हजार १५४ नवमतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहे. जिल्ह्यातील चार तसेच अमरावती जिल्ह्यातील दोन अश्या सहाही विधानसभा क्षेत्रातील हे नवमतदार असून ही संख्या लक्षणीय असल्याचे मत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केले.

sex racket busted at unisex salon prostitution in guise of a unisex salon
युनिसेक्स सलूनच्या आड देहव्यापार – विवाहित महिलेची….
Elections in eight constituencies today in the second phase in the maharashtra state
आठही मतदारसंघांत चुरशीच्या लढती; दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान
अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेऊन…
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Rohit Pawar vs Ravi Rana over amravati rally
“फक्त ३०० मिळाले? नवनीत राणांच्या सभेसाठी महिलांना पैसे दिले?”, रवी राणा म्हणाले, “हो पैसे वाटले…”
Sam Pitroda resign
सॅम पित्रोदांकडून इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
Varsha Gaikawad Congress
उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर; भाजपाकडून पूनम महाजन यांच्याबाबत मौन

हेही वाचा…गडचिरोली : रानटी हत्तीने शेतकऱ्याला पायाखाली चिरडले…

वर्धा लोकसभा मतदारसंघात १ हजार ९९७ केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ६ हजार ४९ पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. एकूण १६ लाख ८२ हजार ७७१ मतदार पात्र आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून विविध उपक्रम राबविण्यात आले होते. महिला मतदान केंद्र हे विशेष आकर्षण आहे.