शहरातील खेळाडू व प्रशिक्षकांची मागणी; स्पर्धा लांबणीवर पडल्याने शंभर दिवसांपासून सराव बंद
नागपूर : तब्बल शंभर दिवसांपासून शहरातील क्रीडा सराव बंद असल्याने आता खेळाडू मात्र सरावासाठी शिथिलतेची मागणी करू लागले आहे. करोना संकट डिसेंबपर्यंत सावरले नाही तर तोपर्यंत आम्ही काय करावे, असा सवालही ते करू लागले आहेत. त्यामुळे लवकर नियमावली जाहीर करून सरावासाठी मुभा द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
मार्च महिन्यात संचारबंदी व लगेच टाळेबंदी झालेले सर्व क्षेत्र प्रभावित झाले आहेत. अशात क्रीडा क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. अनेक स्पर्धा लांबणीवर गेल्या असून खेळाडूंचा सराव गेल्या शंभर दिवसांपासून बंद आहे. सरकारने इतर क्षेत्रात बरीच शिथिलता दिली असल्याने बाजारपेठा फुलत आहेत. मात्र क्रीडा क्षेत्रासाठी कोणत्याच सूचना शासनाने निर्गमित केल्या नसल्याने प्रशिक्षकांसह खेळाडूही त्रस्त झाले आहेत. खेळाचा सराव बंद असल्याने बहुतांश प्रशिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ऑनलाई प्रशिक्षण शक्य नसल्याने मदानावर सरावासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी क्रीडा क्षेत्रातून होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, अनेक क्रीडा प्रकार आहेत, ज्यामध्ये दोन खेळाडूंचा थेट संपर्क येत नाही. ज्यामध्ये बॅडिमटन, नेमबाजी, टेबल टेनिस, कॅरम अशा खेळांच्या प्रकाराच्या सरावाला तरी परवानगी द्यावी, असे खेळाडू व प्रशिक्षक सांगताहेत. लवकरच आता शाळा व महाविद्यालये सुरू होण्याची चिन्हे आहेत. अशात क्रीडा स्पर्धाही घेण्यात येतील. मात्र विना सराव थेट स्पर्धा खेळल्यास त्यांच्या प्रदर्शनावर परिणाम पडणार असून दुखापतीचीही दाट शक्यता आहे. त्यामुळे लवकर सरकारने आदेश व नियमावली तयार करून क्रीडा सरावाला मान्यता द्यावी, असा सूर खेळाडू व प्रशिक्षकांकडून निघू लागला आहे. सध्या बगिचे आणि मदानावर व्यायाम, फिरणे व धावायला परवानगी असली तरी बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, खो-खो, कबड्डी आदी प्रकारातील खेळाडू मात्र शंभर दिवसांपासून घरामध्ये कोंडल्या गेले आहेत. सरावाची सवय तुटल्याने परत मदानात आपली चमकदार कामगिरी दाखवण्यासाठी दोन महिन्यांचा सराव आवश्यक आहे. त्यामुळे आता क्रीडा संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना निवेदन देणार आहेत.
क्रीडा संकु लाच्या कामाचा आयुक्तांकडून आढावा
विभागीय क्रीडा संकु लाच्या कामाचा आज विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सकाळी आढावा घेतला. यावेळी उपायुक्त रोजगार हमी योजना राजलक्ष्मी शहा, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, कार्यकारी अभियंता भानुसे उपस्थित होते. क्रीडा विभागाचे उपसंचालक अविनाश पुंड यांनी आज सादरीकरण के ले. क्रीडा संकु लातील जागेचे विहित पट्टा नूतनीकरणाबाबत चर्चा करण्यात आली, हाऊस किपिंग व सिक्युरिटीची मान्यता घेण्यात आली. तसेच क्रीडा संकु लाच्या जागेचे आरक्षण बदलाच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी यावेळी दिली.
नेमबाजीत तसेही दोन खेळाडूंमध्ये अंतर असते. शिवाय क्रीडा साहित्य देखील खेळाडूंचे स्वत:चे असतात. त्यामुळे नेमबाजीच्या सरावाला परवानगी द्यायला हवी. दिल्लीत सरावाला मुभा दिली असून उत्तरप्रदेशात नेमबाजीचे क्लब सुरू झाले आहेत. पुढे स्पर्धा होणार असून दोन ते तीन महिने सराव करणे आवश्क आहे. त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत.
– अनिल पांडे, राष्ट्रीय नेमबाज प्रशिक्षक