News Flash

राज्यातील ‘त्या’ उपकेंद्र सहायकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

महावितरणने जुलै २०१९ मध्ये सुमारे दोन हजार उपकेंद्र सहायकांच्या पदासाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबवली.

संग्रहीत

प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांना महावितरणकडून नियुक्तीचे आदेश

नागपूर : राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीटीव्हीटी) प्रशिक्षणार्थी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या राज्यातील ३५२ विद्यार्थ्यांना महावितरणमध्ये उपकेंद्र सहायकपदी नियुक्ती मिळत नव्हती. ‘लोकसत्ता’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित करताच महावितरणने एनसीटीव्हीटीशी संपर्क साधला. यानंतर काहींना प्रमाणपत्र मिळाले तर इतरांनाही लवकरच मिळणार आहे. हे प्रमाणपत्र १० मार्चपूर्वी उमेदवारांनी महावितरणला दिल्यास  एस.ई.बी.सी. व ई.डब्ल्यू.एस. प्रवर्गातील आरक्षण वगळता इतरांना नियुक्ती मिळणार आहे.

महावितरणने जुलै २०१९ मध्ये सुमारे दोन हजार उपकेंद्र सहायकांच्या पदासाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबवली. यासाठी २५ ऑगस्ट २०१९ला ऑनलाइन परीक्षा झाली. त्यात निवड झालेल्या उमेदवारांची यादी २८ जून २०२०ला तर अतिरिक्त निवड यादी २२ ऑगस्टला जाहीर झाली. दोन्ही निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची मंडळनिहाय तपासणी एक आणि दोन डिसेंबर २०२०ला झाली.  कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाल्यापासून १५ ते २० दिवसांत नियुक्तीपत्र प्रदान केले गेले. मात्र त्यात निवडलेल्या ३५२ उमेदवारांकडे अटीनुसार प्रशिक्षणार्थी परीक्षेचे प्रमाणपत्र नव्हते.

या उमेदवारांकडे उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक असतानाही दिल्लीच्या एनसीटीव्हीटीचे प्रमाणपत्र नसल्याने त्यांची नियुक्ती थांबवण्यात आली. ‘लोकसत्ता’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत महावितरणने या उमेदवारांची यादी दिल्लीच्या एनसीटीव्हीटीला पाठवली व संबंधितांना प्रमाणपत्र देण्याची विनंती केली गेली.

त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाले. महावितरणने आता ३ मार्चपूर्वी एस.ई.बी.सी. आणि ई.डब्ल्यू.एस. प्रवर्ग वगळता हे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या उमेदवारांना उपकेंद्र सहायकाच्या पदावर नियुक्तीचा निर्णय घेतला आहे.

महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक (मासं) यांचे आदेश विविध कार्यालयांतील मुख्य अभियंत्यांना मिळाले आहेत. या वृत्ताला महावितरणच्या जनसंपर्क विभागानेही दुजोरा दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 1:55 am

Web Title: order of appointment from msedcl to those who submit certificate akp 94
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांच्या सचिवासह वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिलासा
2 वाघांचे आनुवंशिक वैविध्य संपण्याची भीती
3 मुकेश अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचं नागपूर कनेक्शन आलं समोर
Just Now!
X