पुणे : करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आणि सध्याचा ऑक्सिजन तुटवडा विचारात घेऊन सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाने प्राणवायू निर्मिती आणि भरणा प्रकल्प (ऑक्सिजन जनरेशन अँड बॉटलिंग प्लँट) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. दर दिवशी २५ लिटरपर्यंतचे सुमारे ५० ते १०० सिलिंडर या प्रणालीद्वारे भरणे शक्य होणार आहे.

राज्यात प्राणवायूच्या तुटवड्यामुळे परराज्यातून ऑक्सिजन आणावा लागत आहे. त्यामुळे सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यापीठाने शहर आणि जिल्ह्यातील रुग्णांची गरज लक्षात घेऊन प्राणवायूची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या खडकी प्रवेशद्वाराजवळ प्राणवायू निर्मिती आणि भरणा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. गुजरातमधील कं पनीकडून हा प्रकल्प घेण्यात आला आहे. पुढील तीन ते चार आठवड्यात हा प्रकल्प कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

प्राणवायू प्रकल्पाबाबत विद्यापीठाचे कु लगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, की प्राणवायूचा पुरवठा हा महासाथीतील महत्त्वाचा भाग आहे. महासाथ संपल्यानंतरही हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे.  विज्ञान विभागातील संशोधनासाठी प्राणवायूची गरज लागते. त्यामुळे विद्यापीठातील संशोधनासाठी किं वा पुण्यातील अन्य संशोधन संस्थांना प्राणवायू पुरवता येईल, असेही डॉ. करमळकर यांनी नमूद के ले.

प्राणवायू प्रकल्पासाठीचा आवश्यक सुमारे २८ लाखांचा निधी सामाजिक उत्तरदायित्वाच्या निधीतून उभा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्या दृष्टीने चर्चा सुरू आहे. मात्र सीएसआरद्वारे निधी उपलब्ध न झाल्यास प्राध्यापक-कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाचे वेतन त्यासाठी देण्याचा विचार करता येईल, असेही डॉ. करमळकर यांनी नमूद केले