नागपूर : अरबी समुद्रात निर्माण झालेले तौत्के चक्रीवादळामुळे रेल्वेने नागपूरमार्गे पुरी आणि हापाकडे जाणारी रेल्वे १७ आणि १९ मे रोजी बिलासपूर आणि ओखा येथून निघणाऱ्या गाडय़ा रद्द के ल्या आहेत. या गाडय़ा नागपूरला १७ आणि २० मे रोजी येणार नाहीत. या वादळामुळे समुद्र किनारपट्टीतील सर्व शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. गुजरातच्या किनारपट्टीवर १७ आणि १८ मे रोजी सर्तकतेचा इशारा दिला आहे. तिकडे जाणाऱ्या आणि तिकडून येणाऱ्या रेल्वेगाडय़ामध्ये बदल करण्यात आले आहे. नागपूर धावणारी ओखा ते पुरी विशेष गाडी १९ मे रोजी रद्द करण्यात आली. ती २० मे रोजी नागपूरला येणार नाही. तर बिलासपूर ते हापा विशेष गाडी १७ मे रोजी रद्द करण्यात आली. ही गाडी १७ मे रोजी नागपुरात येणार नाही.
संग्रहित लेख, दिनांक 17th May 2021 रोजी प्रकाशित
तौक्ते चक्रीवादळामुळे पुरी, हापा रेल्वे रद्द
या वादळामुळे समुद्र किनारपट्टीतील सर्व शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. गुजरातच्या किनारपट्टीवर १७ आणि १८ मे रोजी सर्तकतेचा इशारा दिला आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 17-05-2021 at 02:30 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Puri hapa railway canceled due to cyclone ssh