* सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कासखेडीकर यांचे मत
* लोकसत्ता कार्यालयाला भेट

गेल्या काही वर्षांत रस्त्यांवरील अपघातांत अनेकांना जीव गमवावा लागला. काहींना कायमचे अपंगत्व आले. अपघातांची कारणे अनेक असली तरी त्यात महत्त्वाचे कारण म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे आणि त्याच्या शिक्षणाबाबत सरकारचे कुठलेही धोरण नाही. सरकारने कायदे आणि नियम तयार केले, मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही, असे मत जनआक्रोश संघटनेचे प्रमुख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कासखेडीकर यांनी व्यक्त केले.

uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
Ananta joshi cap collector
गोष्ट असामान्यांची Video: ३५००पेक्षा जास्त भन्नाट टोप्यांचा खजिना जपणारे अनंत जोशी
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
Maldhok birds
अग्रलेख: पूतनामावशीचे पर्यावरणप्रेम!

रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू असताना राज्यात सर्वच ठिकाणी वाहतुकीसंदर्भात सरकार विविध जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करीत आहे. त्यात जनआक्रोश ही संघटना सहभागी झाली आहे. कासखेडीकर यांनी लोकसत्ता कार्यालयाला भेट दिली असता ते बोलत होते. वाहतुकीच्या संदर्भात सरकारने नियम आणि कायदे केले असले तरी त्या कायद्याची आणि नियमांची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे लोकांची मानसिकता ही वाहतुकीचे नियम न पाळण्याची झाली आहे. याला आळा बसावा आणि लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने जनआक्रोश या संस्थेची स्थापना करण्यात आली. महापालिका वाहतुकीच्या संदर्भात नियमांचे पालन करण्यासाठी रस्त्यावर व्यवस्था निर्माण करते. नियमांच्या अंमलबजावणीसाठी वाहतुकीसंदर्भात लोकशिक्षणाची गरज आहे. ते शिक्षण देण्याची व्यवस्था शासन आणि प्रशासनाकडे नाही. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसाठी कायदे आणि नियम केले असले तरी त्याबाबत जनजागृती करण्यात आली नाही.  हेल्मेटसक्ती करण्यात यावी यासाठी जनआक्रोशने गेल्या अनेक वषार्ंपासून आग्रह धरला असताना शासनाने ती केली. मात्र, आजही अनेक लोक हेल्मेट न घालता वाहन चालवितात. जनआक्रोशचे ६० ते ७० सदस्य असून त्यापैकी ४० सदस्य शहरातील विविध भागातील चौकात दर बुधवारी उभे राहून लोकांमध्ये वाहतुकीसंदर्भात जनजागृती करण्याचे काम करीत असतात.

स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना वाहतुकी संदर्भात व्यवस्था निर्माण करण्याकडे महापालिका लक्ष देत नाही. त्याबाबत अनेकदा निवेदने दिली आहेत. मात्र, ते होत नाही. ज्या वयात मुलांमध्ये वाहतुकी संदर्भात जनजागृती करण्याची गरज आहे, ती केली जात नाही. संघटनेचे कार्यकर्ते गेल्या साडेतीन वषार्ंपासून शहरातील विविध भागातील चौकात पिवळे टी शर्ट परिधान करून सिग्नलच्या ठिकाणी उभे राहून नागरिकांना वाहतुकीचे नियम समजावून सांगतात. वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे ही जीवन पद्धती व्हावी, नागरिकांची मानसिकता तयार व्हावी यादृष्टीने ही  संघटना सातत्याने काम करीत आहे. या संघटनेत डॉक्टर, वास्तूविशारद, वकील, शिक्षक, प्राध्यापक, निवृत्त अधिकारी, उद्योग क्षेत्रात काम करणारी सेवानिवृत्त मंडळी आहे. ते दररोज सायंकाळी शहरातील किमान दोन चौकामध्ये हातात वाहतुकीचे नियम असलेले फलक घेऊन जनजागृती करीत असतात. वाहतूक पोलीस चौकात असले तरी नागरिकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देत असतात. कुणी चुकीच्या पद्धतीने गाडी उभी केली किंवा कोणाजवळ वाहन परवाना नाही अशांना बाजूला घेऊन त्यांना माहिती दिली जाते. शालेय विद्यार्थ्यांजवळ मोठय़ा प्रमाणात दुचाकी वाहने आली असताना त्यातील ७० टक्के मुलांजवळ परवाने नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्यांना सूचना दिल्या जातात आणि त्यांचे प्रबोधन केले जाते.

वाहतुकीसंदर्भात जे प्राथमिक नियम आहेत त्याची माहिती सिग्नलवर असलेल्या लोकांना दिली जाते. सिग्नलवर थांबण्यासाठी रेष मारलेली असताना अनेक लोक समोर वाहने उभी करतात किंवा हिरवा दिवा लागण्याच्या आधी वाहन समोर नेतात अशा लोकांना रोखण्याचे काम करीत असतो. साधारणत: रोज ४ ते ५ हजार नागरिकांना सूचना देत नियमांचे पालन करण्यास सांगितले जाते. अपघातमुक्त शहर करण्यासाठी गेल्या साडेतीन वषार्ंपासून प्रयत्न सुरू असून त्याला यश मिळत आहे. प्रादेशिक परिवहन विभागात जडवाहन चालविणाऱ्या चालकांसाठी गेल्या वर्षभरापासून दर आठवडय़ात शिबीर आयोजित करीत असतो. आमच्या शिबिरात  सहभागी झाल्यानंतर परवाना नूतनीकरण केले जाते. आतापर्यंत ३५ हजार चालकांना वाहतुकीच्या नियमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले असून त्याचा अनेकांना उपयोग झाल्याचे चालक सांगतात. शाळा, महाविद्यालयात जाऊन प्रशिक्षण सुरू केले असून एक लाखाच्यावर विद्याथ्यार्ंना वाहतुकीच्या नियमांबाबत जागृत करायचे आहे. आतापर्यंत ६० शाळा आणि विविध खासगी आणि शासकीय कार्यालयात संघटेनेच्या कार्यकर्त्यांनी शिबिरे घेऊन जनजागृती केली आहे.

‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल सुरू असताना शहरातील विविध भागातील चौकात झेब्रा कॉसिंग नाही, थांबा रेषा दिसत नाही, अनेक ठिकाणी सिग्नलचे दिवे बंद आहेत. काही ठिकाणी दिवे झाडामागे लपल्यामुळे लोकांना दिसत नाहीत, या कारणांमुळे अपघात होत असतात. अशा सर्व समस्यांबाबत महापालिकेत अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, तक्रारीबाबत महापालिका प्रशासन दखल घेत नाही. अशी खंत रवींद्र कासखेडीकर यांनी व्यक्त केली.