News Flash

विदर्भात  तापमान वाढले

उपराजधानीतील तापमान फे ब्रुवारीच्या अखेरीस वाढायला सुरुवात झाली होती.

नागपूर : उपराजधानीसह संपूर्ण विदर्भातील तापमानात पुन्हा एकदा वाढ सुरू झाली आहे. सात जिल्ह्यांमधील तापमान ४० अंश सेल्सिअसहून अधिक असून सर्वाधिक तापणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी ४२.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

उपराजधानीतील तापमान फे ब्रुवारीच्या अखेरीस वाढायला सुरुवात झाली होती. पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत जात असतानाच सलग तीन दिवस अवकाळी पाऊस कोसळला. वादळीवाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे वातावरणात बदल झाला आणि तापमानात मोठी घट झाली. मात्र, आता पुन्हा एकदा तापमानाचा पारा चढू लागला आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 1:54 am

Web Title: the temperature rose in vidarbha akp 94
Next Stories
1 आयएफएस महिला असोसिएशनचे ‘पीसीसीएफ’ला पत्र
2 घराजवळील विलगीकरण केंद्रामुळे करोनावर नियंत्रण शक्य
3 पारंपरिक शेतीला नवा पर्याय व संशोधन स्वीकारणे आवश्यक
Just Now!
X