scorecardresearch

यवतमाळ : सोनपापडीचे आमिष दाखवून ११ वर्षीय बालिकेवर अत्याचार; महागाव तालुक्यातील घटना

महागाव तालुक्यातील ईजनी येथे एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उजेडात आली.

यवतमाळ : सोनपापडीचे आमिष दाखवून ११ वर्षीय बालिकेवर अत्याचार; महागाव तालुक्यातील घटना
प्रतिनिधिक छायाचित्र

महागाव तालुक्यातील ईजनी येथे एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उजेडात आली. या प्रकाराचा शारीरिक व मानसिक धक्का बसल्यामुळे पीडित आजारी पडली. यामुळे हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> नागपूर : विदर्भातील अग्निवीर सैन्य भरतीला सुरुवात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित बालिकेचे वडील मोलमजुरी करतात तर आई घरकाम करते. पीडित मुलगी मागील चार दिवसांपासून आजारी होती. वडिलांनी मुलीला विश्वासात घेत तिची विचारपूस केली. त्यावेळी तिने आपबिती वडिलांना सांगितली. आरोपी पीडित मुलीच्या शेजारी राहतो. त्यामुळे पीडिता आणि आरोपीचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. चार दिवसांपूर्वी पीडित अल्पवयीन मुलगी घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने तिला आपल्या घरी सोनपापडी देण्याच्या आमिषाने बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. यावेळी आरोपीचे तीन मित्र उपस्थित होते. त्यांनी घटनेवेळी आरोपीच्या घराच्या दाराची कडी बाहेरून लावून घेतली आणि घराबाहेर पाळत ठेवली होती, अशी फिर्याद पीडित मुलीच्या वडिलांनी महागाव पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी नराधम आणि त्याला सहकार्य करणाऱ्या आरोपींविरोधात कलम ३७६, १०९, बाल लैंगिक आत्यचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत कलम ४,६, व ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 11 year old girl molested by luring sonpapadi amy

ताज्या बातम्या