नागपूर : अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने पोट दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. आईने डॉक्टरांकडे नेल्यानंतर मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मुलीच्या पालकांना धक्का बसला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध कळमेश्वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

पीडित १६ वर्षीय मुलगी कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिचे रविवारी अचानक पोट दुखायला लागले. त्यामुळे मुलीला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी केली व मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगतिले. मात्र, आईचा विश्वास बसेना. त्यामुळे तिने डॉक्टरांना पुन्हा तपासणी करण्याची विनंती केली. डॉक्टरांनी पुन्हा तपासणी करून मुलगी गर्भवती असल्याचे निदान करून पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. हे ऐकून आईला धक्का बसला. मुलीला घरी आणल्यानंतर हा काय प्रकार असल्याचे तिला विचारले. परंतु, मुलीने काहीही बोलण्यास नकार दिला. प्रियकराचे नाव सांगण्यास मुलगी तयार नव्हती. आम्ही दोघांनी सहमतीने शारीरिक संबंध केल्याचे सांगून प्रियकराचे नाव सांगणार नसल्याचे मुलीने आईला सांगितले. सूत्राच्या माहितीनुसार, मुलगी दहावीत असतानाच तिची एका युवकासोबत मैत्री झाली होती. दोघांचे सूत जुळले आणि प्रेमसंबंध निर्माण झाले. शाळा सुटल्यानंतर दोघांच्या भेटी वाढत गेल्या. गेल्या १ एप्रिल रोजी दोघांनी घरी कुणी नसताना शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोघेही वारंवार घरी कुणी नसताना भेटत होते. त्यातून मुलगी गर्भवती झाली. परंतु, पहिले दोन महिने मुलीच्या लक्षात आले नाही. त्यानंतर गर्भवती असल्याची माहीत झाल्यानंतर ती घाबरली. परंतु, काय करावे? कुणाला सांगावे? घरी बदनामी होईल, अशी भीती वाटल्याने मुलीने कुठेही वाच्यता केली नाही. चार महिने झाल्यानंतर मुलीचे पोट दुखत असल्याच्या कारणावरून आईला हा प्रकार आला. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून कळमेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
MPSC interview
‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”