वाशीम राज्य शासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव यांच्याशी राज्य कर्मचारी संघटनेची बैठक निष्फळ ठरली असून जिल्ह्यातील विविध शासकीय विभागातील १७ हजार कर्मचारी मंगळवार १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.

हेही वाचा >>>वर्धा : रेल्वे महाव्यवस्थापकांचा दौरा अन् स्थानिक प्रशासनाचा काळजाचा ठोका चुकतो तेव्हा..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील काही दिवसांपासून राज्यात जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या मागणीने चांगलाच जोर धरला आहे. जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव यांच्याशी झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने उद्या मंगळवार १४ मार्चपासून जिल्ह्यातील विविध शासकीय विभागातील १७ हजार कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती सरकारी निम सरकारी कर्मचारी शिक्षक संघटना, समन्वय समितीचे निमंत्रक तथा जिल्हाध्यक्ष तात्या नवघरे, प्रसिद्धी प्रमुख सोनुने यांनी दिली. या संपामुळे मोठ्या प्रमाणावर शासकीय कामकाज प्रभावित होणार असून शासनाने आमच्या मागण्या मंजूर करण्याची मागणी होत आहे.