चलनात नव्याने आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा नागरिकांना एटीएममधून मिळाव्यात यासाठी शहरातील विविध बँकांचे ‘एटीएम’ अद्ययावत करण्याचे काम सुरू असून नव्या दोन हजारांच्या नोटांचा पुरवठा कमी होत असल्याने ग्राहकांना आता नव्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

[jwplayer CdTbNsE8]

मशीनमध्ये दोन हजारांच्या नोटांचा ट्रे लावणे आणि नवीन सॉफ्टवेअर अपलोड करण्यासाठी अभियंते कामाला लागले आहेत. टप्प्या टप्प्याने यात सुधारणा केली जात आहे. बहुतांश बँकेचे एटीएम अद्ययावत करण्यात आले आहेत तर अनेक एटीएमचे काम अद्याप सुरूचआहे. मात्र रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकांना दोन हजारांच्या नोटांचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी होत असल्याने अद्ययावत मशीन बंद स्थितीत पडलेल्या आहेत. पाचशे व एक हजाराच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर नागपुरातील जवळपास सर्व एटीएममधून मर्यादित प्रमाणात केवळ शंभरच्या नोटा ग्राहकाला मिळत होत्या. चलनासाठी शंभरच्या नोटा मिळविण्यासाठी लोकांनी एटीएमबाहेर एकच गर्दी केली होती. त्यामुळेच नव्याने आलेल्या दोन हजारांच्या नोटांसाठी एटीएममध्ये आवश्यक बदल करणे कठीण जात होते. मात्र, आता नागरिकांची एटीएम बाहेरी गर्दी ओसरल्याने एटीएम अद्ययावत करण्याचे काम प्रत्येक बँकांकडून सुरू करण्यात आले.

दोन हजाराच्या नोटांचा आकार छोटा असल्याने त्याच आकाराचा ट्रे लावण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. एटीएममध्ये असलेल्या सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. मात्र हे तांत्रिक काम असल्याने आणि एटीएम मशीनच्या ठिकाणी जाऊन हे बदल करायचे असल्याने यात अनेक अडचणी समोर आल्या.

शहरात राष्ट्रीयीकृत व खासगी बँकेचे जवळपास बाराशे एटीएम आहेत. बँकांना सुविधा देणारी एटीएम मशीन ही विविध खासगी कंपान्यांची आहे. एटीएम मशीनची सुविधा देणाऱ्या शहरात आठ ते दहा कंपन्या आहेत. बँकांनी आपल्या सोईने त्यामध्ये बदल करण्याचे काम सुरू केले आहे. कॅनरा बँकेचे ३६ एटीएम अद्ययावत करण्याचे काम पूर्ण झाले आहे.  बँकांमध्ये आरबीआयकडून मिळणाऱ्या दोन हजाराच्या नोटांचा पुरवठा कमी होत असल्याने एटीएममधून त्या ग्राहकांना मिळण्यास विलंब होत आहे. त्याचा मनस्ताप  ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

‘आरबीआय’कडून नव्या नोटांचा पुरवठा कमी

‘आरबीआय’कडून दोन हजारांच्या नोटा पुरेशा प्रकाणात मिळत नसल्याची तक्रार अनेक बँकांची आहे. एटीएम अद्ययावत करूनही ग्राहाकांना सुविधा देण्यापासून बँकेला वंचित राहावे लागत आहे. बँक ऑफ त्रिवेनकोर येथील गांधीबाग शाखेत दोन हजारांच्या नोटा आरबीआयकडून मिळत नसल्याने नव्या नोटा बदलवून देण्याचे काम ठप्प पडले असून अनेक एटीएमही बंद करण्यात आले आहेत.

[jwplayer PuSvtqP8]

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2000 note shortage after updated atms
First published on: 23-11-2016 at 05:03 IST