scorecardresearch

अमरावती : ‘त्‍या’ २२ गावांवर एक रुपयाही वीज थकबाकी नाही..

वरूड तालुक्‍यातील २२ गावांतील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील वीज ग्राहकांनी संपूर्ण वीजबिल भरून थकबाकीमुक्त होण्याचा किंवा वीजबिलाची थकबाकी शून्यावर आणण्‍याची आगळी वेगळी कामगिरी केली आहे.

villages Varud taluka electricity
अमरावती : 'त्‍या' २२ गावांवर एक रुपयाही वीज थकबाकी नाही.. (प्रातिनिधिक छायाचित्र)

अमरावती : महावितरणच्या वीजबिल भरण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत वरूड तालुक्‍यातील २२ गावांतील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील वीज ग्राहकांनी संपूर्ण वीजबिल भरून थकबाकीमुक्त होण्याचा किंवा वीजबिलाची थकबाकी शून्यावर आणण्‍याची आगळी वेगळी कामगिरी केली आहे.

वीजबिल वसुलीसाठी अमरावती जिल्ह्यात महावितरणकडून जोरकस प्रयत्न करण्यात येत आहेत. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील वीजग्राहकांचाही महावितरणला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिणामी ३० मार्चपर्यंत जिल्ह्यातील वरूड उपविभाग १ अंतर्गत येत असलेली २२ गावे थकबाकीमुक्त झाली आहेत.

हेही वाचा – महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलीस नक्षल्यांमध्ये धुमश्चक्री, एक नक्षलवादी ठार

कार्यकारी अभियंता (प्रभारी) प्रशांत काकडे यांच्या नेतृत्वात उपकार्यकारी अभियंता राजेश दाभाडे यांनी तांत्रिक, बाह्यस्त्रोत आणि अतांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने वीज ग्राहकांपुढे वेळीच वीजबिलाबाबत जनजागृती केली, तसेच वेळोवेळी महावितरणच्‍या आर्थिक परिस्थितीची जाणीव करून दिली. सोबत ग्राहकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळत गेल्याने ग्राहकांची संपूर्ण थकबाकी शुन्य होण्याबरोबरच वरूड उपविभागातील २२ गावांनी वीज ग्राहकांसाठी वापरलेल्या विजेचे पैसे वेळेत भरलेच पाहिजे, असा आदर्शही घालून दिला.

हेही वाचा – देशात वाघांची संख्या ३५०० हून अधिक! ‘प्रोजेक्ट टायगर’ला ५० वर्षे पूर्ण

थकबाकी शून्य झालेल्या वरूड उपविभाग १ मधील २२ गावांमध्ये रोहनखेडा, कुरली, मुसळखेडा, वाठोडा, सावंगी, अमडापूर, चंदास, घोराड, पोरगव्हाण, बाबुळखेडा, उदापूर, डवरगाव, फत्तेपूर, इसापूर, देऊतवाडा, खानापूर, मेंढी, हातुर्णा, टेमणी, चिंचरगव्हाण, मोरचुंद आणि राजुरबाजार या गावांचा समावेश आहे. वापरलेल्या वीजेचे संपूर्ण वीजबिल विहीत मुदतीत भरणाऱ्या गावकऱ्यांचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी व अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी आभार मानले व ग्राहकांना चांगली सेवा देवून त्यांच्यामध्ये वीजबिलाविषयी जनजागृती करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतूक केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 14:11 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या