जगातील वनस्पती बायोमासच्या नुकसानीच्या सुमारे दोन ते तीन टक्के आहे, असे ‘ग्लोबल चेंज बायोलॉजी’ या नियतकालिकात नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासातून उघड झाले. जर्मनीतील ‘म्युझिक टेक्निकल युनिव्हर्सिटी’च्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.

अहवालानुसार जंगलातील आगींत वनस्पती जळल्यामुळे दरवर्षी १.२६ अब्ज टन कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो. पावसाळ्यात वीज पडणे ही सामान्य घटना आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सध्या उष्णकटिबंधीय प्रदेशात वीज पडून नष्ट होणाऱ्या झाडांचे प्रमाण सर्वाधिक आहे. वीज पडणे हे अनेक जंगलांमध्ये झाडे नष्ट होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. आधी दरवर्षी वीज पडून नष्ट होणाऱ्या झाडांची संख्या स्पष्ट होत नव्हती. या संशोधनामुळे मात्र त्यांचा अंदाज घेता आला.

संशोधनाने अंदाज व्यक्त करण्यास मदत करणारी पहिली पद्धत विकसित केली. आता दरवर्षी वीज पडून किती झाडे नष्ट झाली याबरोबरच विजेमुळे सर्वाधिक प्रभावित झालेले प्रदेशदेखील ओळखता येतील. या अभ्यासातून वीज पडण्यामुळे जागतिक स्तरावर होणाऱ्या झाडांच्या नष्ट होण्याचा आणि संबंधित कार्बन प्रभावांचा पहिला अंदाज देण्यात आला आहे. यापुढे वेगवेगळ्या जंगलांमध्ये विजेचे पर्यावरणीय परिणाम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची गरज आहे, असेही मत अभ्यासकांनी नोंदवले आहे.

अहवालात काय?

● वनस्पती जळल्यामुळे दरवर्षी १.२६ अब्ज टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● उष्णकटिबंधीय प्रदेशात वीज पडून नष्ट होणाऱ्या झाडांचे प्रमाण सर्वाधिक ● जंगलांमध्ये विजेचे पर्यावरणीय परिणाम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची गरज अधोरेखित