अकोला : पती, सासू-सासऱ्याने मिळून पत्नीची हत्या केल्याची घटना तेल्हारा तालुक्यात उघडकीस आली. आरोपींनी प्रथम हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे भासवले होते. पोलीस तपासात हत्या झाल्याचे समोर आले. जया गोपाल पातोंड (३२, रा.दहीगांव अवताडे, ता. तेल्हारा) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

तेल्हारा पोलीस ठाण्याअंतर्गत ग्राम दहिगाव अवताडे येथील ३२ वर्षीय विवाहितेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पतीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी या प्रकरणात आकस्मित मृत्यूची नोंद केली.

हेही वाचा – तर खासगी बसचे परमिट व परवाना रद्द होणार

या प्रकरणी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. वैद्यकीय अहवालात विवाहितेची आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचे समोर आले. तेल्हारा पोलिसांनी पती गोपाल समाधान पातोंड, सासरा समाधान किसन पातोंड आणि सासू देवका पातोंड यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. जया आणि गोपालमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सतत वाद होत होते. मागील महिन्यामध्ये दोघा पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने पत्नी माहेरी गेली होती. काही दिवसानंतर दोघांची समजूत काढण्यात आली.

हेही वाचा – गोंदिया : आर्द्रा नक्षत्राची सुरुवात दमदार पावसाने; धान उत्पादक शेतकरी सुखावला, पेरणीला येणार वेग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पत्नी परतल्यानंतर पती तिच्यावर शेतात कामाला जाण्यासाठी दबाव आणत होता. मात्र, पत्नीने शेतात कामाला जाण्यासाठी स्पष्ट नकार दिला. यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होता. या वादातूनच विवाहितेची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी तेल्हारा पोलीस पुढील तपास करीत आहेत.