चंद्रपूर: मुल तालुक्यातील जुनासुर्ला ग्रामपंचायतमध्ये कार्यरत संगणक चालकाने ग्रामपंचायतीच्या १४ वा वित्त आयोग बँक खात्यातील शिल्लक असलेला ८ लाख ४० हजार निधी थेट स्वतःच्या खात्यात वळती करून ऑनलाइन जुगारात उडविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने जिल्हा परिषद पंचायत विभागात खळबळ उडाली आहे.

१४ वा वित्त आयोगाचा कालावधी संपला. मात्र, जुनासुर्ला ग्रामपंचायतीचा ८ लाख ४० हजार रुपयांचा निधी अखर्चित होता. शासनाने या आयोगातील निधी खर्च करण्यास एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. याच संधीचा फायदा घेत ग्रामपंचायतीमधील संगणक चालकाने सरपंच व ग्रामसचिवाच्या डीएससीचा गैरवापर केला आणि १४ वा वित्त आयोगातील ८ लाख ३९ हजार रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने आपल्या स्वत:च्या बँकखात्यात वळती केला. यातील २३ हजार रुपयांचे देयक रद्द झाले. मात्र, खात्यात वळती केलेल्या ८ लाख १६ हजारांची रक्कम ऑनलाइन जुगारात उडवल्याची बाब समोर आली आहे.

Mumbai Municipal Commissioner, Mumbai Municipal Commissioner bhushan Gagrani, bmc, bhushan Gagrani Ensures Continuation of Cleanliness Drive, Cleanliness Drive in mumbai, Cleanliness Drive by bmc, Cleanliness Drive bhushan gagrani,
स्वच्छता मोहीम सुरूच राहणार, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची ग्वाही
Global market opened by Amazon to 15 thousand small businessmen of the state
राज्यातील १५ हजार लघु-व्यवसायिकांना ‘ॲमेझॉन’कडून जागतिक बाजारपेठ खुली
Engineer bribe Dhule district
धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात
pmc bank scam marathi news, pmc bank
पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरण : सिंधुदुर्गातील १८०७ एकर जमिनीवर ईडीची टाच, जमिनीची किंमत ५२ कोटी ९० लाख रुपये

हेही वाचा… मराठा आंदोलन आणि ओबीसींमध्ये अस्वस्थता

दरम्यान ही बाब सरपंच व सचिवांच्या लक्षात येऊनही त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केला जात आहे. १४ वित्त आयोगातील पेमेंट हा सरपंच आणि ग्रामसचिवांच्या डीएससीचा वापर करून ऑनलाइन पीएफएमएस प्रणालीद्वारे करावयाचा असतो. डीएससी ठेवण्याची जबाबदारी सरपंच व ग्रामसचिवाची असते. संगणक चालकाने डीएससीचा वापर करून आपल्या खात्यात रक्कम वळती कशी केली? मार्चपासून काढलेल्या रकमेचा 5c जमा खर्च सचिवांनी मासिक सभेत का दिला नाही, की मासिक सभाच झाली नाही, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता होवू लागली आहे.

हेही वाचा… भारतीयांनो, तुमचा प्राणवायू धोक्यात! २१ वर्षात तब्बल ३.५९ लाख हेक्टर….

दरम्यान पोलिस कारवाईच्या भीती व बदनामीपासून वाचण्यासाठी सरपंच व गावातील काही नेत्यांनी संगणक चालकासोबत तडजोड केल्याची चर्चा आहे. नंतर संगणक चालकाने शेती विकून ८ लाख १६ हजार रुपयांचा भरणा ग्रामपंचायतीच्या खात्यात करून या प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीकडून अहवाल मागविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने दिली.

अशी काढली रक्कम

ग्रामपंचायतीच्या खात्यातून २९ मार्च रोजी १ लाख ६७ हजार, २८ मे २ लाख ३३ हजार, ६ जूनला २ लाख, १५ जून १ लाख ९२ हजार, ५ ऑगस्ट २३ हजार, ८ ऑगस्टला २४ हजार असे एकूण ८ लाख ३९ हजार रुपयांचा १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट स्वतःच्या बँक खात्यात वळती केला. मात्र, यापैकी २३ हजारांचे देयक रद्द झाले.