भंडारा : शहरातील कारागृह मार्गावरील बीएसएनएलच्या दुमजली प्रशासकीय इमारतीला आग लागल्याची घटना आज, २३ एप्रिल रोजी अंदाजे पहाटे ५ वाजताच्या दरम्यान घडली. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा – नागपूर: चित्त्यांसाठी नव्या अधिवासाचा शोध; गांधीसागर अभयारण्यावर मध्य प्रदेश सरकारचे शिक्कामोर्तब

at least 24 dead in highway collapse in china
चीन महामार्ग दुर्घटनेत २४ जणांचा मृत्यू
Water wastage due to leakage of Ransai Dam water channel
उरण : रानसई धरणाच्या जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणी वाया
traffic jam, Thane Belapur road, breaking of height barrier
हाईट बॅरियर तुटल्याने ठाणे बेलापूर मार्गावर मोठी कोंडी
Mumbai, Fire Breaks Out, Government Building bandra, Fire Government Building bandra, bandra news, fire news, fire in bandra, mumbai news, marathi news, fire brigade, firefighters,
वांद्रे परिसरातील सरकारी कार्यालयाला आग

या आगीत कार्यालयीन कागदपत्रे जळून राख झाली. महत्त्वाची दस्तऐवज जळाली आहे का, याबाबत तपास सुरू आहे. सुरक्षा रक्षकाने अधिकाऱ्यांना पहाटे कॉल करून इमारतीच्या खोलीतून धूर निघत असल्याचे सांगितले. ताबडतोब अग्निशमन दल, नगर परिषद मुख्याधिकारी जाधव व पोलीस विभागातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.