अमरावती : ओळखीच्या महिलेच्या सांगण्यावरून एका युवकाच्या घरी गेलेल्या १६ वर्षीय मुलीवर सहा जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना वरूड तालुक्यातील शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली आहे. बलात्काराच्या या घटनेचे आपण साक्षीदार आहोत, ही घटना जगजाहीर करू, अशी धमकी देत आठ दिवसांनी पुन्हा दोन आरोपींनी या मुलीवर बलात्कार केला. अखेर या मुलीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

या प्रकरणात शेंदूरजनाघाट पोलिसांनी सहा आरोपींच्या विरोधात बलात्कार आणि ‘पोस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल केला. सहाही आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींना सहाय्य करणाऱ्या महिलेला देखील गजाआड करण्यात आले आहे. मनीष सदापुरे (२५), अमोल बोके (२४), पीयूष डोके (२२), केशव वंजारी (२७), हर्षल गोहत्रे (२८), कपिल तिडके (२४) अशी आरोपींची नावे असून एका ४७ वर्षीय महिलेला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

man jumps into lake after being fed up with expenses of daughters treatment
मुलीच्या उपचाराच्या खर्चाला कंटाळून पित्याची तलावात उडी; वेळीच दोन पोलिसांनी…
boy was molested, molest,
१० वर्षांच्या मुलावर दोघांकडून अत्याचार, एकाला अटक, दुसरा मुलगा अल्पवयीन
Sassoon, pune, Sassoon dean,
ससूनमध्ये वाद पेटला! आयुक्तांच्या निर्णयाच्या विरोधात अधिष्ठात्यांची थेट भूमिका
Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे

हेही वाचा >>> अमरावतीत ‘लव्‍ह जिहाद’च्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; खासदार राणांसह अनेक नेते सहभागी

आरोपी मनीष सदापुरे हा घरी बोलावत असल्याचा निरोप पीडित मुलीच्या ओळखीच्या महिलेने दिला. विश्वास ठेवून ही मुलगी तेथे पोहचली. महिलेने दार बाहेरून लावून घेतले, त्यानंतर स्वयंपाक खोलीतून बाहेर आलेल्या पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी पीडितेला देण्यात आली. आरोपी मनीष सदापुरे याने महिलेला फोन करून बाहेरून लावलेला दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यानंतर पीडिता त्या घरातून बाहेर पडू शकली.

हेही वाचा >>> गडचिरोली: नक्षलवाद्यांची आमदारासह प्रशासनाला धमकी; सूरजागड लोहखाण बंद करा अन्यथा…

सामूहिक अत्याचाराच्या या घटनेच्या आठ दिवसांनी आरोपी हर्षल गोहत्रे याने महत्त्वाचे बोलायचे आहे, असे सांगून तिला दुचाकीवर बसवून एका शेतात नेले. मागील आठवड्यातील घटना आपल्याला माहीत आहे, असे सांगून तिच्या बदनामीची धमकी देत या ठिकाणी दोघांनी तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. मुलीने कशीबशी सुटका करून घर गाठले आणि नंतर पोलीस ठाण्यात पोहचून तक्रार नोंदवली.