नागपूर : विदर्भातील काँग्रेसचे १० आमदार मतदान होईपर्यंत पुण्यात राहून महाविकास आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करणार आहेत. यापैकी पाच आमदारांना निरिक्षकांची जबाबदारी देण्यात आली असून इतर पाच आमदार प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.

विदर्भातील १० मतदारसंघासाठी पहिल्या दोन टप्प्यात मतदान पार पाडले आहे. चौथ्या टप्प्यात पुणे लोकसभेसाठी मतदान होत आहे. काँग्रेसने या मतदारसंघात पोटनिवडणुकीत विजयी झालेले आमदार रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरवले आहे. काँग्रेसने धंगेकर यांच्या पाठीशी संपूर्ण ताकद उभी केली असून विदर्भातील दहा आमदारांना मतदान प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर पुण्यात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान होताच विदर्भातील सर्व दहा आमदार पुण्याकडे रवाना झाले आहेत. या सर्व आमदारांना दैनंदिन अहवाल पक्षाला सादर करावयाचा आहे. निरीक्षक म्हणून नियुक्त झालेल्या आमदारांनी बुथ स्तरापासून नियोजन प्रारंभ केले आहे.

mla vikas thackeray claim congress candidate ravindra dhangekar victory with with big margin
विदर्भात सुरू झालेली भाजपविरोधाची लाट आता देशभरात
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
rahul gandhi on modi adani ambani criticism
Video : “अदाणी-अंबानी पैसे देतात, हे तुम्हाला कसं माहिती?” पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आरोपाला राहुल गांधींचं प्रत्युत्तर
sharad pawar on narendra modi
“अतृप्त आत्मा ५० नाही, तर ५६ वर्ष झाली महाराष्ट्रात भटकतोय, पण तुमच्यासारखी व्यक्ती…” शरद पवारांचा पुन्हा पंतप्रधान मोदींना टोला!
sharad pawar ajit pawar marathi news
“माझे बंधू आजारी असताना शेवटच्या काळात…”, शरद पवारांची अजित पवारांवर थेट टीका: म्हणाले…
Ajit pawar and sharad pawar (1)
“माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं?”, अजित पवारांचा शरद पवारांना थेट प्रश्न
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
Sam Pitroda resign
सॅम पित्रोदांकडून इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

हेही वाचा >>> वडेट्टीवार म्हणतात, ‘शरद पवार मूळचे गांधी विचारांचे’; सत्ता परिवर्तन होणार

आमदार विकास ठाकरे यांना वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. आमदार धीरज लिंगाडे यांना शिवाजीनगर, ॲड. अभिजीत वंजारी यांना कोथरूड, अमित झनक यांना पर्वती आणि सुभाष धोटे यांच्याकडे कसबापेठ विधानसभा मतदारसंघाची निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. हे सर्व दहा आमदार विधानसभा मतदारसंघाचा दौरा करून जिल्हाध्यक्ष, विधानसभा क्षेत्रातील प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी यांची बैठक घेऊन निवडणुकीचे नियोजन करीत आहेत.