लोकसत्‍ता टीम

अमरावती: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागातील माताकोल संरक्षण कॅम्‍पनजीक कारा येथील एका युवकावर वाघाने हल्ला केल्‍याची घटना सोमवारी दुपारी घडली. या युवकाला वाघाने फरफटत दरीत ओढून नेले. घटनास्थळी त्‍याचा मोबाईल, पॅन्‍ट, रक्ताचे शिंतोडे आहेत. त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे.

राजेश रतिराम कास्देकर (२८, रा. कारा) असे या युवकाचे नाव आहे. निस्ताराचे बांबू तोडण्यासाठी कारा येथील तीन मजूर माताकोल संरक्षण कॅम्‍प परिसरात गेले होते. सोमवारी दुपारी त्यांच्यावर वाघाने हल्ला केला व राजेशला दरीत ओढून नेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा… नागपुरात कापलेल्या झाडांच्या फांद्या रस्त्यावरच; पादचाऱ्यांना अडचणी

भुरेलाल कास्देकर, सुखलाल धांडे हे घाबरून एका झाडावर चढल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. घटनास्थळी रक्ताचा सडा साचला होता. वाघाने राजेशला खोल दरीत ओढत नेल्याने त्‍याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्‍ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.