scorecardresearch

गोंदिया : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

सरपण गोळा करीत असताना झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने महिलेवर हल्ला केला. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

गोंदिया : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
गोंदियात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार (छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वडेगाव/बंध्या येथे वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना आज, गुरुवारी दुपारी घडली. आशा संजय ताळाम (३५), असे असे मृत महिलेचे नाव आहे.

हेही वाचा- नागपूर : नायलॉन मांजा विक्री विरोधात पोलिसांचे छापेसत्र, बड्या विक्रेत्यांवर नजर

आशा ताळाम इतर सहा-सात महिलांसोबत सरपण आणण्यासाठी वडेगाव/बंध्या ते वाळव्ही रस्त्यावरील जंगलात गेल्या होत्या. सरपण गोळा करीत असताना झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेत वनविभागाला कळवले. वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीकरिता पाठवला. मृत महिलेच्या कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून २५ हजार रुपये देण्यात आले. शासन निर्णयाप्रमाणे २० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती नवेगावबांधचे सहायक वनसंरक्षक दादा राऊत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 19:09 IST

संबंधित बातम्या